$type=ticker$snippet=hide$cate=0

वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमती विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन

बीड । प्रतिनिधीः- संपुर्ण देशभरात दररोज वाढणार्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. केंद्र सरकारकडून वाढवण्यात येणार्या पे...


बीड । प्रतिनिधीः-

संपुर्ण देशभरात दररोज वाढणार्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. केंद्र सरकारकडून वाढवण्यात येणार्या पेट्रोल,डिझेलच्या किंमतीच्या विरोधात आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत डोक्यावर पडल्यासारखे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली नगर नाका परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने इंधनाच्या किंमती कमी कराव्यात आणि मंत्री दानवेंनी जाहिर माफी मागुन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा नसता अधिक व्यापक स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला आहे.

‘अच्छे दिन येणार ’ अशा भुलथापा देणार्या केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्किल केलेले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकार कोणतीही रोखथाम करताना दिसत नाही. उलट महागाई वाढतच जाताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर आता शंभर रुपयाच्या जवळ गेल्या आहेत. इंधनाच्या किंमती आतापर्यंत कधीही एवढ्या वाढलेल्या नव्हत्या. आज पेट्रोल 92 रुपये तर डिझेल 80 रुपये एवढे झाले आहे. केंद्र सरकारकडून वाढवण्यात येणार्या इंधनाच्या किंमती विरोधात आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे पाकीस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब तर्क लावला त्यांच्या विरोधात शनिवार दि. 12 डिसेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली नगर नाका परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकार्यांनी महागाईचा उडाला भडका, केंद्र सरकारला द्या तडका, रावसाहेब दानवेंचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, देशात राष्ट्रद्रोही कोण आहे? रावसाहेब दानवे चोर आहे. दानवे तात्काळ राजीनामा द्या, शेतकरी आहे सकळ जनांचा अन्नदाता तोच आहे खरा देशाचा भाग्यविधाता अशा घोषणा दिल्या.

या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवसेना युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर कृ.उ.बा.चे माजी सभापती अरुण डाके, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड.संगिताताई चव्हाण, चंद्रकलाताई बांगर, उपजिल्हाप्रमुख हानुमान पिंगळे, सुमनताई गोरे, तालूका प्रमुख गोरख सिंघन, शहर प्रमुख सुनिल सुरवसे, मशरु पठाण, रतन गुजर, रामसिंग टाक, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, शेख फरजाना , सखाराम देवकर, कल्याण कचवट, भागिरथी जाधव, शामल पवार, शारदा डुलगच, चंद्रशेखर कवडे, सारीका काळे, सारीका डोंगरे, संगिता वाघमारे, रेखा वाघमारे, शेख रशिदभाई, शेख कामरान, शेख तौफीक, गोरक्षनाथ कदम, अशोक जगताप, गणेश वळे, मसुराम मोरे, नितीन देवगुडे, गणेश राऊत, ललित आडाणे, ज्ञानेश्वर चव्हाण, आकाश केंद्रे, विजय काटे, शिवराज शिंदे, काकासाहेब जाधव, गणेश मस्के, युवराज मस्के, गणेश जगताप, रमेश करांडे, बाळू घोलप, ऋषीकेश दहिवाळ आदिसह शिवसैनिक सहभागी झाले होते.ं

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15558,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12669,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमती विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन
वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या किंमती विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_271.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_271.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content