माजलगाव । प्रतिनिधीः केंद्र सरकारने कृषी विषयक तीन विधेयकांना मान्यता दिली आहे त्यास विरोध म्हणून विविध शेतकरी संघटनांनी येत्या 8 डिसेंबर रो...
माजलगाव । प्रतिनिधीः
केंद्र सरकारने कृषी विषयक तीन विधेयकांना मान्यता दिली आहे त्यास विरोध म्हणून विविध शेतकरी संघटनांनी येत्या 8 डिसेंबर रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद ठेऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी पत्रकान्वये केले आहे.
केंद्र सरकारने कृषी विषयक तीन विधेयके शेतकर्याच्या विरोधात असून त्या विधयकांना विविध शेतकरी संघटना विरोध करत आहेत. या जाचक आणि शेतकर्याच्या हिता विरोधात देश पातळीवर विविध संघटना एकवटल्या आहेत. येत्या 8 डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून लोकाशाही मार्गाने समर्थन द्यावे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सचिव, अधिकारी आणि संबंधित कर्मचार्यांनी बंदला पाठिंबा द्यावा असेही आवाहन सभापती अशोक डक यांनी केले आहे.