येमेन : येमेन मधील आदेन शहरातील विमानतळावर झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्य...
येमेन : येमेन मधील आदेन शहरातील विमानतळावर झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांना घेऊन विमान लँड झाले त्यावेळी हा स्फोट झाला. पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाबाबत सरकारी प्रवक्त्यांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्फोटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे या स्फोटाची तीव्रता समजून येत आहे.