$type=ticker$snippet=hide$cate=0

जामिन प्रक्रीया संशयाच्या भोवऱ्यात? चुकांवर पांघरूण घालणारा तो भाऊ कोण?

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी जामीन मिळवण्याचा प्रयत्न करणे हा संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या  प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे तर तो हक्क नाकारणे किंवा ...


अहमदनगर/विशेष प्रतिनिधी
जामीन मिळवण्याचा प्रयत्न करणे हा संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या  प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे तर तो हक्क नाकारणे किंवा मंजूर करणे हा न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे.एव्हढी सुस्पष्टता घटनेने मान्य केली असतानाही  मुलभूत अधिकाराची चौकट कितपत पाळली जाते,किंबहूना जाणीवपुर्वक प्रलंबीत ठेवली जात असल्याने एकूण व्यवस्थेला हक्क अधिकाराची व्याप्ती समजून सांगण्याची निकड घटना तज्ञ व्यक्त करू लागले आहेत.
शंभर दोषी सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष व्यक्ती कायद्याच्या चक्रात पिसला जाऊ नये,हा आपल्या राजघटनेचा मुळ गाभा आहे,हा गाभा केंद्रस्थानी ठेवून न्यायदानाची प्रक्रीया राबवावी अशी घटनाकारांची अपेक्षा होती,माञ आपल्या लोकशाहीच्या वाढत्या वयासोबत व्यवस्था जसजशी प्रगल्भ होऊ लागली तसतसा हा गाभा संशयाच्या धुराड्यात अदृश्य होऊ लागला.आणि व्यक्तीपरत्वे व्यवस्थेची चाकं फिरू लागली.विशेषतः न्यायदानाच्या प्रक्रीयेतील अतिशय मुलभूत असलेले जामीन प्रकरण या संशयाच्या धुराड्यात सापडल्याची चर्चा मुलभूत हक्क अधिकाराच्या मुल्यांवर कुरघोडी करीत आहे.
महाराष्ट्रात विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या खटल्यांमध्ये जामिन देण्याची किंवा नाकारण्याच्या प्रक्रीयेला विलंब होत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे.अर्थात काही प्रकरणांमध्ये तत्कालीक कारणांमुळे प्रक्रीया लांबणीवर पडत असेल तर तांञिकदृष्ट्या त्याचे कायद्यात समर्थन देता येऊ शकेल.माञ कित्येकदा पंधरापंधरा दिवस जामीनाच्या सुनावणीसाठी तारखाही दिल्या जात नाही,कोठडीतील जामिन असो नाही तर अटकपुर्व जामिन असो,नियमीत कालावधीत प्रक्रीया पुर्ण व्हावी हीच घटनेची अपेक्षा आहे.न्यायिक प्रशासानाने त्यासाठी निश्चित कालावधीही ठरवून दिला आहे.तरीही पक्षकारांना त्यांचा हा हक्क तितक्याच सुलभपणे मिळतो का? कुठले तरी एक पारडे अधिक झुकते का? या प्रश्नांची उत्तरे मागण्याची जबाबदारी न्यायालयीन आवारात वावरणाऱ्या कायदे तज्ञांची आहे.
सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले अहमदनगरचे रेखा जरे हत्याकांड याच मार्गाने वाटचाल करीत नाही ना? हे पहाण्याची जबाबदारीही कायदे तज्ञांवर येऊन पडली आहे.या प्रकरणातील मुख्य संशयीत बाळ बोठे याने दाखल केलेल्या अटकपुर्व जामीन अर्जाच्या सुनावणीचा प्रवास सध्या चर्चेत आहे.प्रातिवादी आणि वादी यांच्या दरम्यान तब्बल दोन दिवस सुरू असलेली युक्तीवादाची जुगलबंदी सुरू असल्यामुळे या प्रकरणातील उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.या ठिकाणी मुद्दामहून नमूद करू इच्छितो की,न्यायव्यवस्थेच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा वा भुमिकेवर टिपण्णी करण्याचा कुठलाही जाणता अजाणता हेतू नाही,घटनेचे मुलभूत अधिकार शाबूत रहावेत यासाठी लोकशाहीचा पाईक स्तंभ म्हणून अपेक्षित कर्तव्य न्यायदेवतेची माफी मागून पार पाडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

चुकांवर पांघरूण घालणारा तो भाऊ कोण?

रेखा जरे यांची हत्याकांडातील मुख्य संशयतीची उकल झाल्यानंतर माध्यमक्षेञातील काही नावं संशयाच्या भोवऱ्यात फिरू लागली.त्यातच वर्षभरापुर्वी म्हणजे ७ जुन २०१९ रोजी  अहमदनगरच्या एका स्थानिक वृत्तवाहीनीवर रेखा जरे यांच्या वाढदिवसाचे वृत्त प्रसारीत झाले होते.या वृत्तांतात रेखा जरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चुकांवर पांघरूण घालणाऱ्या एका भावाचा नामोल्लेख केला होता,दैवदुर्दैव्य विलास म्हणा किंवा आणखी काही,रेखा जरे यांच्या हत्याकांडानंतर हनी ट्रॕप प्रकरण आंगतूक चर्चेत आले.ज्या वृत्तपञाने हे प्रकरण त्याआधी छापले त्या वृत्तपञाचा कार्यकारी संपादक या हत्याकांडात मुख्य संशयीत असल्याचा दावा पोलीसांनी करणे,जरे यांच्या मनोगतातील भाऊ मुख्य संशयिताचा खबरी असल्याची चर्चा होणे हा सारा योगायोग म्हणायचा का? नेमका हा भाऊ कुठल्या चुकांवर पांघरूण घालीत होता? हनी ट्रॕप प्रकरण ऐन चर्चेत असताना या भावाचे कारनामे काया होते? तोफखाना,कोतवाली,नगर तालुक्यासह शहरातील अन्य पोलीस ठाण्यातील खास माणसांकरवी प्रतिष्ठीतांना जाळ्यात कसे अडकवले अशा नाना रंजक कथा ऐकायला येत आहेत.त्याचा परामर्श उद्याच्या अंकात.. 
Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9974,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4147,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15360,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12457,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3442,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जामिन प्रक्रीया संशयाच्या भोवऱ्यात? चुकांवर पांघरूण घालणारा तो भाऊ कोण?
जामिन प्रक्रीया संशयाच्या भोवऱ्यात? चुकांवर पांघरूण घालणारा तो भाऊ कोण?
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_278.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_278.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content