मुंबई : नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. वैद्यकीय आस्थापना नियमन कायदा नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समित...
मुंबई : नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. वैद्यकीय आस्थापना नियमन कायदा नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सोमवारी केल्या आहेत. साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जन आरोग्य अभियान यांच्या वतीने राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. अभय शुक्ला, डॉ. स्वेता मराठे नर्सिंग संघटनेच्या प्रा. प्रविणा महाडकर, डॉ. स्मिता राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणार्या परिचारीका व कर्मचार्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले. त्याबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. डॉ. गोर्हे यांच्या पुढाकाराने नर्सेससाठी प्रथमच ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. कोरोनाचा काळ हा कठीण काळ होता. या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, शासनाचे विविध विभाग यांनी अत्यंत कष्टाने ह्या आपत्तीला तोंड दिले व आवश्यक उपाय योजना केल्या. साथी संस्थेने नर्सेसच्या अनुभवावर आधारित जे सर्वेक्षण केले आहे ते शासनापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांवर भर दिला जाईल. नर्सेस कॅडरमधील समन्वय करणारी जी वरिष्ठ पदे आहेत ती तातडीने भरण्यात यावी. वैद्यकीय आस्थापना नियमन कायदा आवश्यक असून त्याबाबतीत अधिक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. हिवाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात बैठक घेण्याची सूचना डॉ. गोर्हे यांनी यावेळी दिली.