निलंबित होताच केशवसिंह यांनी चिरागचे केले अभिनंदन पक्षातून निलंबित झाल्याचे कळताच केशवसिंह यांनी चिराग पासवान यांचे अभिनंदन केले तसेच अशाच ...
निलंबित होताच केशवसिंह यांनी चिरागचे केले अभिनंदन
पक्षातून निलंबित झाल्याचे कळताच केशवसिंह यांनी चिराग पासवान यांचे अभिनंदन केले तसेच अशाच प्रकारे प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षातून काढून रामविलास पासवान यांचे स्वप्न धुळीस मिळवा व राजदला मजबूत करा, असा टोमणाही हाणला.
पासवानांचे स्वप्न धुळीस मिळवा
पाटणा. लोजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष प्रिन्स राज यांनी पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत माजी राज्य सरचिटणीस केशवसिंह यांची तत्काळ हकालपट्टी करीत पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले तसेच त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले. उल्लेखनीय असे की, केशवसिंह यांनी नेतृत्वाविरोधात आघाडी उघडत पुढील महिन्यात लोजपात फूट पडणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
पक्षातून निलंबित झाल्याचे कळताच केशवसिंह यांनी चिराग पासवान यांचे अभिनंदन केले तसेच अशाच प्रकारे प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षातून काढून रामविलास पासवान यांचे स्वप्न धुळीस मिळवा व राजदला मजबूत करा, असा टोमणाही हाणला. यासोबतच चार खासदारांसह मोठ्या संख्येतील नेते नवा पक्ष स्थापन करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सर्व खासदार, आमदार एकजूट : पारस
लोजपाचे संस्थापक स्व. रामविलास पासवान यांचे बंधू व खासदार पशुपती कुमार पारस यांनी पक्षाचे सर्व खासदार राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वात एकजूट आहेत, असा दावा केला. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही असेही ते म्हणाले. पक्षविरोधी घटकांतर्फे पक्षात फूट असल्याच्या वावड्या उठविल्या जात असून बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय सर्व खासदारांच्या उपस्थितीतच घेण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने पासवान यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली असून मताधिक्यही वाढले असल्याचा दावा पारस यांनी केला.