चिखली :- भारत सरकारने शेतकरी हिताचा कृषी सुधारणा कायदा लागू केल्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेस व अन्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे अन्य व...
चिखली :- भारत सरकारने शेतकरी हिताचा कृषी सुधारणा कायदा लागू केल्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेस व अन्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे अन्य विरोधक भारत बंदचे आवाहन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना फसवत आहे. कृषी सुधारणा विधेयक शेतकरी हिताचे असल्याने त्यांना समृद्धीकडे नेणारा असल्याने नवीन कृषी कायद्याच्या समरनार्थ आ.सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने चिखली शहरात भव्य मोटार सायकर रॅली काढून या कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.
एकीकडे दिनांक ०८ डिसेंबर २०२० रोजी कॉंग्रेस व अन्य पक्षांनी भारत बंदचे आयोजन केलेले असतांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने कृषी विधेयकाच्या समरनार्थ भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने उघडी ठेवल्याने भारत बंदचा फज्जा उडाला आहे. त्यातच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्च्याच्या वतीने चिखली शहरात मोटार सायकल रलीचे आयोजन केल्याने चिखली शहर नेहमीप्रमाणे गजबजलेले राहिले.
“भारत माता की जय”, “कृषी सुधारणा विधेयक लागू झालेच पाहिजे”, “मोदी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, श्वेताताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जयस्तंभ चौक, चिंच परिसर, देशमुख गल्ली, बाराभाई मोहल्ला, राऊतवाडी, खामगाव चौफुली, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
या मोटार सायकर रलीचे नेतृत्व शिक्षण सभापती तथा नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा शहराध्यक्ष सुदर्शन खरात यांनी केले. यावेळी विजय वाळेकर, ज्ञानेश्वर सवडे, शंकर उद्रकर, शंकर देशमाने, भारत दानवे, शैलेश सोनुने, राहुल राऊत, चेतन देशमुख, अक्षयआप्पा भालेराव, संदीप पाटील, सागर पुरोहित, चेतन जोशी, प्रसाद ढोकणे, आशुतोष पांडे, दिलीप काळे, सादिक काझी, सोहेल काझी, संदीप खरात, सचिन कुलवंत, कार्तिक जोशी, अजय राजपूत, प्रशांत चौधरी, राम करंडे यश टिपारे, हे उपस्थित होते.