पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश औरंगाबाद/प्रतिनिधी ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्...
पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश
औरंगाबाद/प्रतिनिधी ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे आज गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
मर्यादित पर्यटकांना असणार प्रवेशजागतिक पर्यटनस्थळ असलेल्या वेरूळ व अजिंठा या स्थळांवर दर दिवशी येणार्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहणार असून दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार अशा एकूण दोन हजार याप्रमाणे पर्यटकांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन किंवा क्युआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. यासाठी ुुु.ाींवलीशीेीीीं.ळप तसेच ुुु.रीळ.पळल.ळप या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. कुठल्याही परिस्थितीत पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकिट काढता येणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.टुरिस्ट गाईड आणि पर्यटकांना नियमांचे पालन करावे लागणारजिल्ह्यातील पर्यटनस्थळे सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह सुरू करण्यात येणार आहेत.
पर्यटनस्थळी टुरिस्ट गाईड यांच्याद्वारे पर्यटकांना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेणे महत्वाचे असून यादृष्टीने पर्यटनस्थळे सुरळीतपणे सुरू ठेवण्यात प्रशासनासह टुरिस्ट गाईडची जबाबदारी व भूमिका महत्वपूर्ण राहील, कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी. तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणेने व पोलीस विभाग यांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहुन पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. राज्यात अनेक ठिकाणी पर्यटनस्थळ सुरू करण्यात आली असली तरी, औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ मात्र बंद होती. काही दिवसांपूर्वी पर्यटन व्यावसायिकांनी ऑनलाइन निदर्शने करत पर्यटनस्थळं उघडण्याची मागणी केली. इतकंच नाही तर सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे तसेच महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभुमीवर ही पर्यटनस्थळे खुली करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू करण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतली. या बैठकीत पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पर्यटन उपसंचालक श्रीमंत हारकर, सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, पर्यटनचे सहायक संचालक विजय जाधव, पुरातत्व विभागाचे डॉ. एम. के. चौले, मयुरेश खडके, सोनेरी महलचे ओजस बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, विभागीय नियंत्रक अरूण सिया, जसवंतसिंग अध्यक्ष औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन टुरिस्ट गाईड संघटनेचे सचिव उमेश जाधव यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.