श्रीनगर: काश्मीरमध्ये सुरक्षादलांच्या जवानांनी आज केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. सुरक्षादलांनी आज संयुक्त कारवाईत दोन दह...
श्रीनगर: काश्मीरमध्ये सुरक्षादलांच्या जवानांनी आज केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. सुरक्षादलांनी आज संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. तसेच एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षादलांना यश आले आहे.
ठार करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. सुरक्षादलांनी या दहशतवाद्यांकडून एक एके-47 रायफल, 300 राउंड एम्युनेशन, 6 मॅगझीन, एक यूबीजीएल, 12 ग्रेनेड, दोन मोबाइल सेट आणि एक सॅटेलाइट फोन जप्त केला आहे. गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या नगरोटा चकमकीपासूनच सुरक्षादलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम अधिक तीव्र केली होती. या या दहशतवाद्यांना मदत करणार्यांना देखील या संयुक्त शोधमोहिमेत शोध घेण्यात येत होता.