सावली संघटनेची शेवगाव आगारप्रमुखाकडे मागणी शेवगाव ता प्रतिनिधी ः दिव्यागांना बस प्रवास करतांना तिकीट भाडे सवलतीसाठी वैश्विक कार्ड(युनिक क...
सावली संघटनेची शेवगाव आगारप्रमुखाकडे मागणी
शेवगाव ता प्रतिनिधी ः दिव्यागांना बस प्रवास करतांना तिकीट भाडे सवलतीसाठी वैश्विक कार्ड(युनिक कार्ड) सोबत ओळखपत्र देण्याची मागणी दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी निवेदनाद्वारे शेवगाव आगारप्रमुखाकडे केली आहे.
महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी दिव्यांगांना बस प्रवास करतांना तिकीट सवलतीसाठी वैश्विक कार्ड (युनिक आयडी कार्ड) ग्राह्य धरणे बाबत आदेश केलेल असतांनाही अनेक आगार प्रमुखाकडून आदेशाचे पालन होतांना दिसत नसल्याने दिव्यांगामध्ये संभ्रमाचे वातावरण होत आहे. दिव्यांगाना बस प्रवास करतांना युनिक आयडी कार्ड सोबत स्थानिक आगर व्यवस्थापक यांचे ओळखपत्र देण्यासोबत त्वरीत कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन सावली दिव्यांग संस्थेचे व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव आगार प्रमुखांना देण्यात आले. निवेदन स्थानक प्रमुख प्रवीण दिवाकर यांनी स्वीकारले. सदर बाबत त्वरीत कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे. यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चाँद शेख, कार्याध्यक्ष मनोहर मराठे, सचिव नवनाथ औटी, शहर उपाध्यक्ष सुनील वाळके, आखेगाव शाखा अध्यक्ष मुरलीधर लाड उपस्थीत होते.
सावली दिव्यांग संघटना तसेच शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवास ओळखपत्रसाठी आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये.
चाँद शेख, अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना