किनगाव राजा/प्रतिनिधी आज सर्वात मोठी धक्कादायक बातमी बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र वीर जवान शहीद प्रदीप साहेबराव मांदळे पळसखेड चक्का तालुका सिं...
किनगाव राजा/प्रतिनिधी
आज सर्वात मोठी धक्कादायक बातमी बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र वीर जवान शहीद प्रदीप साहेबराव मांदळे पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा या गावातील गरीब कुटुंबामधील हा तरुण व्यक्ती दोन हजार आठ ते नऊ यास साली फौजी सैन्यदलामध्ये औरंगाबाद या ठिकाणी भरती झाला होता.
शहीद झाल्याचे ठिकाण द्रास टायगर हिल जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत ड्युटीवर होता त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती पत्नीच नाव कांचन प्रदीप मांदळे, प्रदीप च लग्न २०१४ साली झालेलं होतं.
तीन मुलं असून त्यांचे नाव. सुरज, सार्थक, जयदीप असे मुलांचे नाव असून आईचे नाव श्रीमती. शिवनंदा साहेबराव मांदळे भावांचे नाव संदीप साहेबराव मांदळे कृषी सहाय्यक विशाल साहेबराव मान्दळे फौजी सैन्यदलामध्ये सध्या कार्यरत आहे.
बुलडणा जिल्ह्याचे सुपुत्र प्रदीप मांदळे जवान शहीद पश्चिम बंगाल या मधील पन्हागड या ठिकाणी कार्यरत आहे २००८ च्या अगोदर ची परिस्थिती फार गरीब कुटुंबातील ही व्यक्ती असून आई वडील मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण करून तिन्ही मुलं चांगल्या ठिकाणी नोकरी लावणारे शेवटी स्वर्गीय साहेबराव मांदळे यांना सर्व कुटुंबाला सोडून जावे लागले काही आजारामुळे त्यांची मृत्यु दिनांक २०१७ साली झालेला आहे त्यामुळे मोठा मुलगा म्हणून प्रदीप यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती.
त्यामुळे घरात घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे मांदळे परिवार खूप दुःखाचा डोंगर सावट याठिकाणी आहे आणि पळसखेड चक्का या गावांमध्ये अशी घटना पहिल्यांदा घडल्यामुळे या गावांमध्ये खूप दुःख होत आहे.
संदीप साहेबराव मांदळे यांना रात्री नऊच्या दरम्यान मध्ये माहिती मिळाली सैन्य दला कडून फोनवरून माहिती मिळाली तुझा भाऊ शहीद झालेला असल्याची माहिती फोनवर देण्यात आली.
त्यांचा पार्थिव अंत्यविधीसाठी दिनांक १८ तारखेला येईल अशी माहिती प्राथमिक देण्यात आली. मांदळे परिवार जे दुःख आहे ते संपूर्ण जिल्ह्यात असून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे.