लोणंद येथील मुस्लिम समाज बांधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोणंद / वार्ताहर : मुस्लिम समाजास मागासवर्गीय आरक्षण मिळावे या मागणीसह विविध मा...
लोणंद येथील मुस्लिम समाज बांधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोणंद / वार्ताहर : मुस्लिम समाजास मागासवर्गीय आरक्षण मिळावे या मागणीसह विविध मागण्यांसाठीचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र यांस लोणंद नगरपंचायतीद्वारा लोणंद येथील युवा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी 25 समाज बांधवांच्या सहीचे निवेदन लोणंद नगरपंचायत सिं.ओ. / ऑफीस सुप्रिटेंड शंकरराव शेळके यांना निवेदन देताना इकबालभाई बागवान, कय्यूमभाई मुल्ला, जावेद पटेल, मोईन बागवान, इरशाद पटेल, अरीफ आतार, अशरफ पिंजारी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती अतिमागास झालेली आहे.त्या आधारित संवैधानिक कायदा करून 10 टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळणेबाबत या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की, मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे. 2020 पासून पुढे होणार्या सर्व शैक्षणिक संस्थामधील ऍडमिशन 10 टक्के मुस्लिम समाजाला देण्यात याव्यात. सन 2020 पासून पुढे होणार्या सर्व नोकरीमध्ये 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला देण्यात याव्यात. मुस्लिमांवर होणारे हल्ले मॉबलिंचिंगच्या गंभीर घटना, अपशब्द यांना आळा घालण्यासाठी मुस्लिम समाजास ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे. यांसारख्या विविध मागण्या समाजाने समाजाचे समाजासाठी चालवलेले आंदोलन म्हणून काम करत असलेल्या मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत.