कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजापासून मिळणार संपुर्ण सूट बीड। प्रतिनिधीः- थकीत कर्जदारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ऋण समाधान योजना आणली आह...
कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजापासून मिळणार संपुर्ण सूट
बीड। प्रतिनिधीः-
थकीत कर्जदारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ऋण समाधान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजामध्ये संपुर्ण सुट मिळणार आहे. सदरील या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गंगाभिषण थावरे यांनी केले आहे.
अनेक शेतकर्यांकडे कर्जाची बाकी आहे. अशा शेतकर्यांसाठी बँकेने ऋण समाधान योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज खाते एनपीए झाल्यापासून व्याजामध्ये सुट मिळणार आहे. कर्जदारास अर्ज दाखल करतांना ओटीएस रकमेच्या दहा टक्के रक्कम बँकेकडे जमा करावी लागेल. अर्ज शाखाअधिकारी यांच्यानावे असेल तसेच अर्जासोबत दहा टक्के रक्कम भरली नसेल तर अर्जाचा योजने अंतर्गत विचार होणार नाही. योजनेअंतर्गत कर्जदाराचा अर्ज मंजूर झाल्यावर मंजूर झाल्यापासून तिस दिवसाच्या आत ओटीएस रकमेच्या दहा टक्के रक्कम परत बँकेकडे जमा करावे लागेल जर ही रक्कम जमा झाली नाही तर कर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अगोदर जमा केलेली रक्कम परत मिळणार नाही. कर्जदारास उर्वरीत रक्कम बँकेच्या सहा महिने एमसीएलआर व्याज दराप्रमाणे अर्ज मंजूर झालेल्या तारखेपासून आठ महिन्यापर्यंत भरता येईल. जर येणे प्रमाणे राहीलेली रक्कम बँकेकडे जमा न झाल्यास योजनंअर्तगत मंजूर अर्ज रद्द करण्यात येईल याचीही नोंद घ्यावी. ऋण समाधान या 20-21 योजनेपुर्वी इतर ओटीएस अंतर्गत भरलेल्या कोणत्याही रकमेचा परतावा किंवा समायोजन होणार नाही यासह इतर अटी यामध्ये लावण्यात आलेल्या आहे. तरी सबंधीतांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.