मिरजगाव/प्रतिनिधी : मिरजगाव पोलिस दुरक्षेत्र हद्दीतील कंन्ठेश्वर मंदिरा जवळ संशयास्पद फिरतांना रात्री गस्त घालत आसलेले मिरजगावचे पीएसआय अमर...
मिरजगाव/प्रतिनिधी : मिरजगाव पोलिस दुरक्षेत्र हद्दीतील कंन्ठेश्वर मंदिरा जवळ संशयास्पद फिरतांना रात्री गस्त घालत आसलेले मिरजगावचे पीएसआय अमरजीत मोरे यांनी सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महादेव कोहक सह चालक बेग यांच्या मदतीने आरोपींचा पाठलाग करून पकडले.
रोड रॉबरी करण्यासाठी आलेले आरोपी शाहूराज बाबासाहेब कोकरे (वय 20) राहाणार घाटपिंपरी ता.आष्टी जिल्हा बीड व सोबत इसम शिरोळे( संपूर्ण नाव नाही समजले) राहाणार वांगदरी ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हे दोघे ही कंन्ठेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांना दिसले असता, मांदळी मिरजगाव रस्त्यावर गस्त घालत असलेले पीएसआय अमरजीत मोरे यांनी चौकशी साठी थांबले आसतांना आरोपींनी पळवून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांना लगेच पकडण्यात आले. त्याच्याकडील गुन्हासाठी वापरलेली बजाज पलसर 220 ही दुचाकी जप्त केली असुन या गाडीला पुढे वेगळा नंबर व मागील बाजूस वेगळा नंबर आहे. म्हणजे त्यांच्या कडील गाडीही चोरीची असल्याचे दिसून येत आहे.