गायिका, संगीतकार आणि गीतकार म्हणून या कलाविश्वात आपली ओळख बनवणाऱ्या नेहा कक्कर हिनं जवळपास दीड महिन्यापूर्वी रोहनप्रीत सिंग याच्याशी विवाह ...
गायिका, संगीतकार आणि गीतकार म्हणून या कलाविश्वात आपली ओळख बनवणाऱ्या नेहा कक्कर हिनं जवळपास दीड महिन्यापूर्वी रोहनप्रीत सिंग याच्याशी विवाह केला होता. सोशल मीडियावर ही जोडी तेव्हापासूनच ट्रेंडमध्ये आहे.
NehuPreet म्हणून ओळखली जाणारी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत येत असते. त्यांचं एखादं नवं गाण असो किंवा मग लव्हस्टोरी. नेहा आणि रोहनप्रीत मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहेत. आता म्हणजे या जोडीच्या सहजीवनाच्या नात्यात एका नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे.
नेहा गरोदर असण्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. याला कारण ठरत आहे ती म्हणजे तिनं केलेली एक सोशल मीडिया पोस्ट. टोन्ड जमसूट आणि पांढऱ्या स्निकर्समध्ये नेहा आणि तिच्यासोबत सूट, काळ्या रंगाची पगडी अशा रुबाबदार लूकमध्ये असणारा रोहनप्रीत यावेळी त्यांच्या फोटोच्या पोझमुळं अनेकांचं लक्ष वेधत आहेत.