$type=ticker$snippet=hide$cate=0

अल्पसंख्याक कल्याण समन्वय समितीने लेखी निवेदनाद्वारे विचारला शासनाला जाब !

  अंबेजोगाई । प्रतिनिधीः- अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने समाजाचे नेते निर्णय घेतील त्या बाजूने समाज यापूर्वी जायचा त्य...

 

अंबेजोगाई । प्रतिनिधीः-

अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने समाजाचे नेते निर्णय घेतील त्या बाजूने समाज यापूर्वी जायचा त्यामुळे समाजाचे नेते आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचे शिक्षणाचे प्रमाण अल्पसंख्याक समाजामध्ये वाढू लागल्याने अल्पसंख्याक समाजामध्ये जागृती निर्माण होऊ लागली आपले हक्क काय आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागली असल्याने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मागण्याचे निवेदन देण्याऐवजी राज्य शासनाला जाब विचारला जाऊ लागला आहे अंबेजोगाई येथील अल्पसंख्यांक कल्याण समन्वय समितीच्या माध्यमातून अध्यक्ष शकील बागवान ,एडवोकेट इस्माईल गवळी यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांनी उपजिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे शासनाला जाब विचारल्याने समाजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहेङ्गअंबेजोगाईचा विचार केला तर नगर परिषदेत अल्पसंख्याक समाजातील आठ ते दहा नगरसेवक निवडून आले आहेत त्यात काही मोदी तर इतर मुंदडाच्या नेतृत्वाखाली काम करतात समाजाला त्याचेशी घेणेदेणे नाही राजकारणात तुम्हाला कुठे राहायचे ? कोणाच्या नेतृत्वाखाली राजकारण करायचे लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे मात्र समाजाचे नेते म्हणून राजकारणात ,समाजात मिरवताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याचा अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना विसर पडला की काय असा तरुण वर्गाला प्रश्न पडतो अल्पसंख्याक समाज संख्येने कितीही लोकसंख्या जास्त असली तरी विकासाच्या दृष्टीने आजही इतर समाजाच्या तुलनेत मागे आहे त्यामुळे शासनाने सर्व शासकीय कार्यालयाने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करावा असे परिपत्रक काढत असते मात्र त्या दिवसाचे महत्त्व अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करणार्‍या नेत्यानाच नसल्याने समाजाने दोष कोणाला द्यावा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी पूर्वीच्या तुलनेत अल्पसंख्याक समाज चांगल्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात जागृत झालेला आहेङ्गमोदी,मुंदडा का करू शकले नाही ? अंबेजोगाई शहरात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांना राजकारण करत असताना आपल्यासोबत अल्पसंख्याक समाज सोबत असावा वाटतो नव्हे बेसच अल्पसंख्याक समाज आहे साथही दिली मात्र त्या समाजासाठी विविध योजना राबवणे असो इतर मुद्यावर फारसे गंभीर दिसत नाहीत साधा अल्पसंख्याक दिन नगरपरिषद हॉल मध्ये घेऊ शकत का नाहीत ? तीच अवस्था केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचेही तसेच आहे आंबेजोगाई नगर परिषदेत मुस्लिम समाजाची आठ-दहा नगरसेवक कार्यरत आहेत अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून न प च्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करून शहरातील अल्पसंख्याक समाजासाठी आंबेजोगाई नगरपरिषद कोणते उपक्रम राबवत आहे ही माहिती नगर परिषद प्रशासनाला देताङ्गआली असती प्रशासनाने ते केले नाही ती कृती करण्यासाठी एकाही नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना लेखी पत्र देण्याची हिम्मत का केली नाही? असा प्रश्न निर्माण होतो तीच परिस्थिती केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा आहेत त्या भाजपाच्या तिकीटावर निवडून निवडणूक लढवली तरीही अल्पसंख्याक समाजाने त्यांना मते दिली अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मतदारसंघात येणार्‍या आंबेजोगाई ,केज, नेकनूर ह्या तीन शहरात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे आमदार म्हणून एकाही शहरात अशा कार्यक्रमाचे आयोजन त्यांना करावे वाटले नाही त्यांना नका का वाटेना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते शहरात स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरवणार्‍या कार्यकर्ते व नेत्यांना याचा विसर का पडला? कुठवर समाजाच्या नावावर राजकारण करत स्वतःची तुंबडी भरणार आहात ? पूर्वी समाजातील तरुणात समोर बोलण्याची कोणी हिंमत करत नव्हता आता काळ बदलला तसा समाजानेही बदल करून घेतलाय स्वार्थाच्या पुढे समाजाला विसरणारे नेत्यांना जनता ही लवकरच विसरून जात आहे त्यामुळे समाजासाठी जो पुढाकार घेईल त्याला समाज मान्यता मिळते अंबेजोगाई शहरात अलीकडे झालेल्या आंदोलनातून जनतेने स्थानिक नेत्यांना आरसा दाखवला आहे बघायचे की नाही ? ते त्यांनी ठरवायचे आहे आंबेजोगाई तालुका अल्पसंख्याक कल्याण समन्वय समितीचे अध्यक्ष शकील बागवान, एडवोकेट इस्माईल गवळी व इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले आहे निवेदनात मागण्याऐवजी शासनाला प्रश्न स्वरूपात जाब विचारला गेला आहे प्रश्न काय आहेत? पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रमाबाबत अल्पसंख्यांक समाजामध्ये जनजागृती साठी कोणता कालबद्ध कार्यक्रम राबवला व आढावा अहवाल मंत्रालयाकडे पाठवला आहे का ?ङ्गस्थानिक शैक्षणिक समस्येचा आढावा घेऊन अल्पसंख्यांक आयोगाला तो अहवाल पाठवला आहे का किंवा त्यावर कोणत्या उपाययोजना सुचवल्या?ङ्गस्थानिक अल्पसंख्यांक दर्जाच्या शाळा सुधारण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले गेले? अल्पसंख्याक समाजातील महिला व मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत?ङ्गअल्पसंख्याक समाजाचे विविध प्रश्न समजून घेऊन त्यावर काय उपाय योजना केल्या आहेत? अल्पसंख्यांकाचे सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक सर्वेक्षण झाले नाही स्वतंत्र रित्या सर्वेक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना निश्चित केल्या आहेत? आर्थिक परिस्थितीने बिकट असलेल्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला मदत व बँकेमार्फत कर्ज मिळावे यावर कोणत्या उपायोजना आयोजित केले आहेत ? अल्पसंख्याक समाजासाठी यापूर्वी कोणत्या योजना राबवल्या तसेच पुढील वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे का?ङ्गजिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीच्या तिमाही बैठका झालेल्या नाहीत यापुढे तरी बैठकीचे आयोजन करावे अशा मागण्यांचा समावेश आहे.

Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5741,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,190,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,31,satara,128,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4420,नाशिक,802,पुणे,726,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16306,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13529,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3667,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अल्पसंख्याक कल्याण समन्वय समितीने लेखी निवेदनाद्वारे विचारला शासनाला जाब !
अल्पसंख्याक कल्याण समन्वय समितीने लेखी निवेदनाद्वारे विचारला शासनाला जाब !
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_321.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_321.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content