लोणंद पोलिसांची धडाकेबाज कारवाई लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आ...
लोणंद पोलिसांची धडाकेबाज कारवाई
लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना दोन तासांत मुद्देमालासह अटक करून धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल लोणंद पोलीस ठाण्याचे कौतुक केले जाते आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 16 डिसेंबर रोजी फिर्यादी यांनी घाबरलेल्या अवस्थेत लोणंद पोलीस ठाणेत सांगितले की त्यांची मोटार सायकलवरून नीरा ते लोणंद रोडने लोणंद बाजूकडे येत असताना रेल्वे उड्डाण पुलाजवळ त्यांना पाठीमागून आलेल्या पल्सर मोटार सायकलवरील तिघांनी फिर्यादिस गाडीवरून खाली ढकलून देत मोबाईल व पैशाचे पाकीट हे जबरदस्तीने हिसकावून लोणंद बाजूकडे पळून गेले. अशी माहिती फिर्यादीने दिली होती. घटनेचे गंभीर्य ओळखून सपोनि संतोष चौधरी यांनी या ठिकाणची माहिती घेऊन आरोपींची माहिती घेण्याबाबत मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या. त्या प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ घडलेल्या ठिकाणाहुन संशयित आरोपींची माहिती घेऊन व गोपनीय माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा घडल्यापासून दोन तासात आरोपींचा पाठलाग करून गुन्ह्यातील पल्सर मोटार सायकल वरील तीन आरोपींना चोरीस गेलेल्या मालासह ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्यातील आरोपी हे पोलिस रेकोर्डवरील गुन्हेगार आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस हवालदार महेश सपकाळ, अनिल भोसले, दत्ता दिघे, पोलीस नाईक संतोष नाळे, ज्ञानेश्वर साबळे, संजय पोळ, ज्ञानेश्वर मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, अमोल पवार, श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे, अभिजित घनवट, अविनाश शिंदे यांनी सहभाग घेतला.