$type=ticker$snippet=hide$cate=0

आकाशात झेपावण्याआधीच पाळणे जमिनीवर पडून

  राज्यभरातील यात्रा-जत्रांवरील निर्बंधामुळे व्यावसायिक हतबल मायणी / वार्ताहर : राज्य सरकारने लॉकडाऊन उठवून मिशन बिगीन अगेन सुरू केले. मात्र...

 

राज्यभरातील यात्रा-जत्रांवरील निर्बंधामुळे व्यावसायिक हतबल

मायणी / वार्ताहर : राज्य सरकारने लॉकडाऊन उठवून मिशन बिगीन अगेन सुरू केले. मात्र, गावोगावच्या यात्रा-जत्रांवर अद्याप निर्बंध असल्याने यात्राकाळात आबालवृध्दांचे आकर्षण असलेले आकाशी पाळणे अजूनही जमिनीवर पडून आहेत. परिणामी, आर्थिक नुकसानीमुळे पाळणे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान नुकतेच म्हसवड येथे रथयात्रेच्या दिवशी संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मायणी येथील यात्रा म्हसवड येथील यात्रेच्या दिवशीच असते. या सर्व पार्श्वभूमीवर मायणी येथील ग्रामस्थांनी श्री सिध्दनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या मार्च महिन्यात येथील सद्गुरू यशवंतबाबा महाराज यात्रेसाठी विविध खेळणी व आकाशी पाळणे दाखल झाले होते. मात्र, उभारणी करण्यात येत असताना अचानक कोरोनामुळे यात्रा होणार नसल्याचे जाहीर झाले. जगभरात लॉकडाऊन सुरू झाल्याने पाळणे आकाशाच्या दिशेने झेपावण्याआधी ते जमिनीवर पडून राहिले. त्यामुळे त्या एकमेव व्यवसायावर अवलंबून असणार्‍या शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली. वाहतूक व जिल्हा हद्द बंदीने सर्व लवाजमा यात्रातळावर पडून राहिला. गेल्या 9 महिन्यांपासून पाळण्याचे साहित्य खराब होऊ लागले आहे. उत्पन्न नसताना आता साहित्याच्या नुकसानीची भर पडत आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो व्यावसायिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

याबाबत येथील खंडोबा माळावर अडकून पडलेले मोहोळ (जि. सोलापूर) येथील आकाशी पाळण्यांचे व्यावसायिक सुभाष चव्हाण म्हणाले, माचनूर (ता. पाटण) येथील यात्रा उरकून उस्मानाबाद येथील यात्रेसाठी सर्व साहित्य रवाना केले. सुमारे दोन लाख रुपये भाड्यापोटी द्यावे लागले. तेथे यात्रातळावर सामान उतरवले आणि तासाभरात यात्रा भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथून अन्यत्र जाण्याचा निर्णय झाला. दरम्यान, मायणीत यशवंतबाबा यात्रा होणार असल्याचे समजले, तरीही खात्री करण्यासाठी कारभारी मंडळीची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत यात्रा होणार, अशी खात्री कारभारी मंडळींनी दिली. त्यामुळे चार पैसे मिळतील या आशेने पुन्हा लाखभर भाडे खर्चून मायणीत सामान आणून उतरवले.

(पान 1 वरुन) यात्रातळावर येण्यास विलंब झाल्याने लगेच साहित्याची जोडाजोडी करण्यास सुरवात केली. मात्र, दुसर्‍याच दिवशी यात्रा रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले. परिणामी पाळणे व खेळण्यांची जोडाजोडी थांबवली. तेंव्हापासून आजअखेर कुटुंबातील कामगार नुसते आहेत. केवळ भाड्यापोटी लाखोंचे नुकसान झाले. आता आर्थिक उत्पन्न नसताना दैनंदिन खर्च भागविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. शासनाने लवकरात लवकर काही निर्बंध घालून यात्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15558,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12669,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: आकाशात झेपावण्याआधीच पाळणे जमिनीवर पडून
आकाशात झेपावण्याआधीच पाळणे जमिनीवर पडून
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/news-story/cover-images/3palana.jpeg?pHjT7riMrp2oLLWE94M22ahi8CDG9nZL
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_333.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_333.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content