मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष ...
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे.
स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे करणने त्यावर आधारित एक एपिक सीरिज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. #ChangeWithin या थीमवर ही सीरिज आधारित असणार आहे.
करण जोहरच्या या सीरिजवर करणसोबत चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी, दिनेश विजन आणि महावीर जैन हेदेखील काम करणार आहेत.
येत्या नव्या वर्षात करणचे ‘ब्रह्मास्त्र’, ‘सूर्यवंशी’, ‘तख्त’, ‘जुग जुग जिओ’, ‘शहशाह’ असे काही मोठे प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.