सातारा जिल्ह्यामध्ये येलो लाईन कॅम्पियन सुरु सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविला जातो. यावर्षी वि...
सातारा जिल्ह्यामध्ये येलो लाईन कॅम्पियन सुरु
सातारा / प्रतिनिधी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविला जातो. यावर्षी विशेषतः देण्यात आलेले उद्दिष्ट येलो लाईन कॅम्पियन शालेय स्तरावर सातारा जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. विद्यालयीन व महाविद्यालयीन मुले व तरुण पिढी तंबाखू व तत्सम पदार्थांकडे आकर्षित न होता त्यापासून परावृत्त व्हावेत व शाळेच्या 100 यार्ड परिसरातील तंबाखू विक्री करणारी दुकाने उठवण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या सहाय्याने हटवण्यात यावीत हेच या कॅम्पियनचे उद्दिष्ट आहे.
सातारचे जिल्हाधिकारी, शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व नोडल ऑफिसर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे.
कोटपा 2003 कायद्यामधील कलम 6 अ अंतर्गत अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. कलम 6 ब शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. हे दोन्ही कलम शालेय स्तरावर लागू होतात. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 200 रुपयाचा दंड आकारण्यात येतो. यावर्षी नव्याने आखलेल्या येलो लाईन कॅम्पियनमध्ये पिवळ्या रंगाची शाळेच्या 100 यार्ड परिसारवर तंबाखू सेवन, विक्री आणि खरेदी प्रतिबंधित क्षेत्र तसेच तंबाखू मुक्त शाळा असे आईल पेन्टने (शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार) स्पष्ट लिहिण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या आवारात 60 बाय 45 सेमीचा तंबाखू मुक्त परिसर असा मराठी फलक लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने येलो लाईन कॅम्पियनचे व पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग अशा विविध स्तरावर तंबाखू व तत्सम पदार्थांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कोट्पा 2003 कायदा व तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशन याबातीत प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. तरी लवकरात लवकर जिल्ह्यातील 75 शाळा येलो लाईन कॅम्पियन अंतर्गत तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये श्रीमती दिपाली इंगवले (समुपदेशक - एनटीसीपी), श्रीमती इला ओतारी (सोशल वर्कर- एनटीसीपी) व सुरज कवारे (दंत सहाय्यक - एनओएचपी) यांचे मोलाचे सहकार्य आहे.
चौकट
गृहराज्य मंत्र्यांच्या सातार्यातील निवासस्थानासमोर टोबॅको फ्रि झोन
राज्याचे गृहराज्य मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या घरासमोर दोन दिवसापूर्वीच तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोबॅको फ्रि झोन असे रस्त्यावर लिहिण्यात आले आहे. या सरकारी योजनेमध्ये गृहराज्य मंत्री सहभाग घेणार का? घेणार असतील तर त्यांच्या गृह विभागाच्या कर्मचार्यांना तंबाखू जन्य पदार्थापासून कसे दूर ठेवणार? की त्यांच्यासाठी सामुपदेशन मोहीम आखण्याचे नियोजन आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही. अशा वेळी त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच शहरातील नामांकित शाळा-महाविद्यालये तसेच रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय आहे. म्हणून शासनाकडून टोबॅको फ्रि झोन म्हणून रस्ता रंगविण्यात आला आहे, याचे उत्तर सामान्य जनतेला मिळत नाही.