मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं आता एका नव्या तक्रारीसह मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कैद्यांसा...
मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं आता एका नव्या तक्रारीसह मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कैद्यांसाठीचे कपडे घालण्यास इंद्राणी मुखर्जीनं नकार दिला आहे. इंद्राणी सध्या कैद असलेल्या भायखळा जेलचे अधिकारी तिला कैद्यासाठी असलेली हिरवी साडी नेसण्यास सक्ती करत असल्याचा विरोधात करत इंद्राणी मुखर्जीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
शीना बोरा हत्याकांड खटल्याचा निकाल लागणं अद्याप बाकी असल्यानं आपण सध्या प्रलंबित खटल्यातील 'कच्चे' कैदी आहोत. आपल्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच कोर्टाचा अंतिम निकालही लागलेला नाही. त्यामुळे शिक्षा झालेल्या एखाद्या 'पक्क्या' कैद्यांप्रमाणे जेल अधिकारी आपल्याला जेलचे कपडे घालायला सक्ती कशी करू शकतात?, इतर कैद्यांप्रमाणे आपल्याला वागणूक मिळत असल्याला इंद्राणीनं या याचिकेतून विरोध केला आहे. कोर्टानं या याचिकेची दखल घेत 5 जानेवारीपर्यंत भायखळा जेल प्रशासनाला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.