$type=ticker$snippet=hide$cate=0

अग्रलेख : मध्यस्थीने तरी पेच सुटावा

  कोलकात्याची मेट्रो सुरू होऊन तीस वर्षे झाली. दिल्लीत मेट्रो सुरू आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत मेट्रो रुळावर आली आहे. अशा परिस्थितीत मुं...

 

कोलकात्याची मेट्रो सुरू होऊन तीस वर्षे झाली. दिल्लीत मेट्रो सुरू आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत मेट्रो रुळावर आली आहे. अशा परिस्थितीत मुंबई हे आशिया खंडातील लोकसंख्येने सर्वांत मोठ्या शहरात मात्र मेट्रो सुरू झालेली नाही. गेल्या दोन दशकांत या मेट्रोचे काम फार गतीने झाले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात हे काम सुरू झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कामाला गती आली; परंतु आरेमधील कारशेडचा अट्टहास नडला. नंतर हे कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. जमिनीबाबतचा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता कारशेडचे काम कधी होईल, याचा भरवसा नाही. शिवसेना आणि भाजपच्या कलगीतुर्‍यामागे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फरफट होत आहे. मुंबईच्या विकासाचे राजकारणीच मारेकरी कसे ठरतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला करणे कसे फायद्याचे आहे, हे शिवसेना सांगत आहे, तर बोगदे झाल्याने आता कारशेड आरेमध्ये असणे कसे फायद्याचे आहे, हे भाजप सांगतो आहे. त्यावर शंभर कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे कारशेड हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवीत शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात नेण्याचा घाट घातला आहे. या शह-काटशह, अहंकाराच्या नादात मुंबईकरांना काय हवे, तज्ज्ञांना काय वाटते, याचा विचार करायला कुणीच तयार नाही. दोघांच्या भांडणाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो आहे. जी मेट्रो खरेतर 1970 च्या दशकात व्हायला हवी होती. ती त्यानंतरच्या पाच दशकांतही झालेली नाही आणि अजून ती कधी होईल, हे सांगता येत नाही. एन्रॉन, अरामकोचा तेलशुद्धीकरण प्रकल्प आदी कितीतरी प्रकल्पांत राजकारण केल्याने जगातील उद्योगजगतासमोर महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा जाते. त्यामुळे उद्योगपूरक भूमिका घेणार्‍यांत महाराष्ट्र पिछाडीवर पडला आहे. त्याचा फटका परकीय गुंतवणुकीत बसत असून तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकसारखी राज्ये पुढे जात असताना महाराष्ट्राचे पूर्वीचे स्थान दिवसेंदिवस घसरत आहेत. त्याचे भान ना विरोधी पक्षाला आहे, ना सत्ताधार्‍यांना. अशा परिस्थितीत सामंजस्याने भूमिका घेण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. शिवसेना, भाजप या दोन पक्षांतील वरिष्ठ नेत्यांत समन्वय घडवून आणून पेच सोडविण्याचे कौशल्य निर्विवादपणे शरद पवार यांच्याकडे आहे; परंतु त्यासाठी दोन्ही पक्षांना श्रेयवाद आणि अहंकार बाजूला ठेवावा लागेल. तो ठेवण्याची दोन्ही पक्षांची तयारी आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. तसेच राज्याच्या विकासासाठी दोन पावले माघार घ्यावी लागली, तरी चालेल, अशी भूमिका घ्यायची तयारी ठेवावी लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण बाजूला ठेवून दोघेही परस्परांना भेटत असतात. पवार यांनी कृषिमंत्री असताना जशी मोदी यांना काँग्रेसचा विरोध डावलून मदत केली, तशीच मदत आता मोदी यांनीही स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध मोडीत काढीत राज्य सरकारला करायला हवी. त्यात केंद्र आणि राज्य दोघांचा ही फायदा आहे. संघराज्य पद्धतीत दोन्ही बाजूंनी टोकाच्या भूमिका घेऊन चालत नसते. तसे झाले, तर विकासाचा गाडा रुततो. महाराष्ट्र सध्या ते अनुभवतो आहे. केंद्र सरकारला कांजूरमार्गवरच्या जागेचा हट्ट सोडायला लावून त्या जागी कारशेड करणे, त्या बदल्यात राज्यातील दुसरी जागा केंद्र सरकारला देणे, आरेमध्येच कारशेड करणे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अडथळा न करणे, पालघरमधील वाढवण बंदराचे महत्त्व लक्षात घेऊन तेथील विरोध कमी करणे अशा अनेक बाबतीत केंद्र-राज्य सरकारला एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील. केेंद्र सरकारनेही महाराष्ट्रात जे आहे, ते गुजरातला नेणे बंद केले पाहिजे. विकासात निकोप स्पर्धा असणे दोघांच्याही फायद्याचे असते. पवार हे विकासाचे राजकारण करणारे आहे. विकासात राजकारण आणणे त्यांना पसंत नसते. ज्या राज्य सरकारच्या स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्या सरकारलाही प्रसंगी चार शब्द कटू सुनवायची वेळ आली, तरी त्यांनी विकासासाठी ते करायला हवे. छोटे चुकत असतील, तर त्यांचे कान धरण्याचा अधिकार वडीलधार्‍यांना असतो, त्याच भावनेने पवार यांच्या सूचनांकडे पाहायला हवे. सामान्य माणसांचे जीवन सुखकर होण्यासाठी तर राजकारण करायचे असते. चुकणार्‍या राजकीय पक्षांना सामान्य निवडणुकीत शिक्षा देत असतात; परंतु त्यासाठी मधला फार काळ जात असतो. तेवढाही काळ जाऊ देणे म्हणजे विकासाची चाके उलटी फिरवण्यासारखे असते. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामावर स्थगिती आणल्यानंतर पुन्हा एकदा केंद्र आणि ठाकरे सरकार यांच्यातील संघर्ष वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर मेट्रोचा हा वाद सोडवण्यासाठी आता पवार हे मध्यस्थी करणार आहेत. मुंबई मेट्रो-3 च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हा मेट्रो कारशेडचा प्रश्‍न सोडवण्यासाठी विरोधकांना चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांचीच भाषा ठाकरे यांनी केली असून विकासाच्या कामात राजकारण आणू नका. फार तर श्रेय तुम्ही घ्या, असे सांगत त्यांनी हात जोडले आहेत.

तुमच्या वाटेला अपश्रेय येऊ नये ही इच्छा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यावर निर्णायक समाधानकारक तोडगा काढण्यासाठी ठाकरे आणि पवार यांच्यात बैठक झाली. कारशेडबाबत कुठे तरी एकमत व्हायला हवे, अशी पवार यांची भूमिका आहे. तर, वाद सोडून कुठला मार्ग निघाला तर बघायला हवे, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. फडणवीस यांनीही अप्रत्यक्षपणे पवार यांचा सल्ला मानणार असल्याचे सांगितले आहे. ’कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्‍न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार आहेत. गरज पडली तर ते हे एक-दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती नबाब मलिक यांनी दिली आहे. खरेतर पवार यांच्यासोबत ठाकरे आणि फडणवीस यांनीही मोदी यांची भेट घेण्यासाठी जायला हवे. या चौघांच्या भेटीतून जो तोडगा निघेल, तो सर्वांनीच स्वीकारायला हवा.

मुख्यमंत्री आणि वार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. मुंबईच्या विकासात अडथळा नको, यासाठी मुख्यमंत्रीदेखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करीत आहे. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे; पण काही लोक यात राजकारण करत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली ़आहे. कारशेडच्या मुद्द्यावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांत जुगलबंदी झाली. दोघांनीही आपण म्हणतो, तेच ठिकाण कसे योग्य आहे, यावर भर दिला. त्यातून काहीच साध्य होणार नाही. पर्यावरण रक्षण हा मुद्दा आहेच. त्याचबरोबर मुंबईकरांच्या काय सोयीचे, हे ही पाहायला हवे. त्याबाबत पवार यांच्या शिष्टाईला यश येवो, अशी प्रार्थना राज्यातील चारही प्रमुख राजकीय पक्षांनी करायला हवी. 


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4203,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15570,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12681,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अग्रलेख : मध्यस्थीने तरी पेच सुटावा
अग्रलेख : मध्यस्थीने तरी पेच सुटावा
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_349.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_349.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content