मालेगाव : केंद्र शासनाने कृषी विषयक विधेयक मंजूर केले असून ते शेतकरी विरोधी असल्याने त्यात शेतकऱ्यांचा तोटा होणार असून भांडवलदार कंपन्यांचा...
मालेगाव : केंद्र शासनाने कृषी विषयक विधेयक मंजूर केले असून ते शेतकरी विरोधी असल्याने त्यात शेतकऱ्यांचा तोटा होणार असून भांडवलदार कंपन्यांचा फायदा होणार आहे.शेतकऱ्यांचा मालं हमी भावावर विक्री करता येणार नसल्याने पडेल त्या भावात माल विक्री करावा लागणार आहे
त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना आपली शेती कराराने देण्याचा कायदा केल्याने मोठमोठ्या कंपन्या कॉर्पोरेट कुटुंब यात उतरतील शेतकऱ्यांकडून कराराने शेती घेऊन स्वस्तात शेत माल घेतील यात कृषी उत्पन्न बाजार समित्या उध्वस्त होतील.ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते भांडवलदार यांचेसाठी असल्याने केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक त्वरित रद्द करावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अप्पर जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले.
या वेळी,संदीप पवार,जयंत पवार,विजय पवार,राजेंद्र पवार,बाळासाहेब बागुल,विनायक माळी,किशोर इंगळे,विजय दशपुते,ज्ञानेश सोनवणे,प्रकाश वाघ,धनंजय पाटील आदी उपस्थित होते.