अन्यथा सात गावातील नागरिकांसह शिवसंग्रामचा आंदोलनाचा इशारा बीड/प्रतिनिधी ः शेतकरीचे अतिवृष्टी ने अतोनात नुकसान केले कापूस,सोयाबीन, आशा प...
अन्यथा सात गावातील नागरिकांसह शिवसंग्रामचा आंदोलनाचा इशारा
बीड/प्रतिनिधी ः शेतकरीचे अतिवृष्टी ने अतोनात नुकसान केले कापूस,सोयाबीन, आशा पिकांचे अतिशय नुकसान झाले आहे.या नुकसनातून शेतकरी सावरत असताना आज शेतात विहीर,बोरला पाणी असताना ही महावितरणच्या नियोजना अभावी शेतकर्यांना मुबलक वीज मिळत नाही.खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, उमरी,अंथरवन प्रिंपी, नागपूर खुर्द,उमरद खालसा,नागपूर बुद्रुक, अंथरवन प्रिंपी तांडा या सात गावाना बीड नाळवंडी नाका उपकेंद्र येथून च.ख.ऊ.उ व सात गावाना विदूत पुरवठा केला जात आहे परंतु हा भर जास्त होत असल्याने वारंवार तर तुटणे,केबल जाळणे, विदूत फाल्ट होणे या मुळे शेतकर्यांना नागरिकांना वारंवार त्रास होत आहे .
अधीक्षक अभियंता महावितरण जालना रोड कार्यालयात निवेदन देऊन महावितरणने खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, उमरी, अंथरवन प्रिंपी, नागपूर खुर्द, उमरद खालसा, नागपूर बुद्रुक, अंथरवन प्रिंपी तांडा, या सात गावसाठी स्वतंत्र विदूत उपकेंद्र मंजूर करण्यात यावे किंवा विद्युत भार हा खांडे पारगाव, अंथरवन प्रिंपी, अंथरवन प्रिंपी तांडा या गावासाठी नाळवंडी नाका येथून किंवा जवळा येथून विदूत पुरवठा करण्यात यावा व नागपूर खुर्द, उमरी, नागपूर बुद्रुक, उमरद खालसा या गावाच्या भार कुक्कडगाव उपकेंद्र येथून जोडण्यात यावा अन्यथा शिवसंग्राम सात गावातील नागरिक, शेतकरी यांच्या सह तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजेंद्र आमटे,प्रशांत डोरले,खाजभाई पठाण,नानासाहेब आमटे,प्रवीण आमटे, अजित दासवांते आदींच्या वतीने आंदोलन करण्यात येतील असा इशारा देण्यात येत आहे