जळगाव जामोद/ ता.प्रतिनिधी:- स्थानिक नगरपरिषद खत चोरी प्रकरणी मुख्याधिकारी बोबडे व कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मह...
जळगाव जामोद/ ता.प्रतिनिधी:- स्थानिक नगरपरिषद खत चोरी प्रकरणी मुख्याधिकारी बोबडे व कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महा विकास आघाडीचे पदाधिकारी तथा नगरसेवक यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली तसेच महाविकास आघाडीचे गटनेते नगरसेवक यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हे भजन आंदोलन करण्यात आले व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांच्या खुर्चीला हार टाकून खाली खुर्ची ला निवेदन देण्यात आले
जळगाव नगरपरिषद नगरसेवक अर्जुन घोलप व नगरसेवक गजानन वाघ यांनी 17 डिसेंबर रोजी जळगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली की परीक्षित निवृत्ती ठाकरे शासकीय कंत्राटदार व नगरपरिषद चे प्रभारी मुख्याधिकारी आशिष बोबडे यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता व कोणत्या प्रकारची नगरपरिषदेची पावती न देता तीन ट्रॉली सेंद्रिय खत किंमत शंभर रुपये प्रमाणे अंदाजे किंमत 50 हजार रुपये किमतीच्या बॅग व काही खुल्या स्वरूपा मध्ये ट्रॅक्टर भरून शासकीय कंत्राटदार परिक्षित ठाकरे यांच्या शेतात मजुरांद्वारे सेंद्रिय खताची चोरून आणून टाकत असल्याचे महा विकास आघाडीचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले त्यावेळी नगरसेवक संतोष बोरसे व इतर नागरिकांसोबत जाऊन सर्वांच्या समस्या खताच्या चोरीबाबत आरोग्य पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापन पर्यवेक्षक कुमारी पल्लवी इंगळे व मुख्याधिकारी आशिष बोबडे आरोग्य निरीक्षक रमेश चन्द्र चंदाले यांना सेंद्रिय खत विक्री च्या पावती बाबत विचारणा केली असता त्यांनी पावती नसल्याचे स्पष्ट सांगितले त्यानंतर शिवसेना नगरपरिषद गटनेते गजानन वाघ काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप काँग्रेस पक्ष नेत्या स्वातीताई वाकेकर तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर प्रकाश भाऊ पाटील ज्योतीताई ढोकणे मीनाताई सातव नगरसेवक रमेश ताडे,श्रीकृष्ण केदार राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख एडवोकेट संदीप उगले प्रशांत दाभाडे ,शहर अध्यक्षअब्दुल जहिर ,एजाज देशमुख साबीर भाई,शेख जावेद कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते