$type=ticker$snippet=hide$cate=0

गुंतवणूकदारांच्या विश्‍वासावर स्वार झालेला बाजार

गुंतवणूकदार भावनेवर स्वार होत नसतो. तो परताव्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करीत असतो. कोरोनाचा जगातील सर्वंच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झा...


गुंतवणूकदार भावनेवर स्वार होत नसतो. तो परताव्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करीत असतो. कोरोनाचा जगातील सर्वंच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. कोट्यवधी हातांना काम राहिलेलं नाही. त्यातून आता कुठंतरी अर्थव्यवस्था सावरायला लागल्या आहेत. भांडवली बाजार मात्र कधीच सावरला असून त्यानं गेल्या पाच महिन्यांत नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत चांगला परतावा दिला.

कोरोनामुळं जागतिक अर्थव्यवस्थांना आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हतं, एवढं नुकसान झालं. जगातील अर्थव्यवस्था कोरोनामुळे आकुंचन पावल्या. नकारात्मक वाढ नोंदविली. कोरोनाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थांवर झाला. भांडवली बाजारही सातत्यानं कोरोनाच्या भीतीच्या हिंदोळ्यावर झुलत राहिले; परंतु त्यातूनही सकारात्मक भावनेवर बाजार स्वार झाले. अडचणी येत गेल्या. बाजार कोसळत राहिले आणि पुन्हा सकारात्मकतेवर स्वार होत गेले. भारताची लोकसंख्या, त्यातील कोरोनाबाधितांचं प्रमाण तुलनेनं कमी आणि बरं होण्याचं प्रमाण चांगलं राहिलं. त्यातही मृत्यूचं प्रमाण अमेरिकादी राष्ट्रांपेक्षा कमी राहिलं. याचा बाजारावर परिणाम झाला. जागतिक बाजारातून भारतात संस्थात्मक आणि अन्य गुंतवणूक वाढली. एप्रिल-मे महिन्यात दररोज चिंता वाढविणारा भांडवली बाजार सप्टेबरनंतर मात्र सातत्यानं नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत गेला. अधूनमधून करेक्शन होत गेलं. ते होणं स्वाभावीक आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचा एक दिवस बसलेले तडाखा वगळता बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. कोरोना विषाणूच्या तडाख्यात जबरदस्त होरपळून निघालेल्या शेअर निर्देशांकांनी नव्यानं उभारी घेत गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली. 2020 या वर्षात नीचांकी पातळी गाठणारा सेन्सेक्स तब्बल 21 हजार अंकांनी वधारला. सध्या तो 47 हजार अंकांवर आहे. टाळेबंदीमध्ये केवळ भारतीय बाजार नाही, तर जगभरातील प्रमुख भांडवली बाजारांना कोरोनानं तडाखे दिले. कमॉडिटी बाजारात इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे भाव शून्य डॉलरखाली गेले होते. त्यामुळं एकच खळबळ माजली; मात्र कोरोनावर लस संशोधन करण्यात यश आलं आणि बाजाराचा नूर पालटला. निर्देशांकांनी तेजीची वाट धरली. मागील सहा महिने भांडवली बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळालं. याच काळात परदेशी गुंतवणूक विक्रमी स्तरावर झाली. प्राथमिक बाजारातदेखील भांडवल उभारण्यासाठी आलेल्या कंपन्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. चीनमध्ये धुमाकूळ घालणार्‍या कोरोनानं भारतात शिरकाव केला आणि गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली. मार्चमध्ये भारतात कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर खबरदारी म्हणून केंद्र सरकारनं टाळेबंदी जाहीर केली. या घडामोडी सेन्सेक्ससाठी घातक ठरल्या. 23 मार्च 2020 रोजी सेन्सेक्सनं तीन हजार 934 अंकाची ऐतिहासिक घसरण नोंदवली. बाजार बंद होताना 13 टक्क्यांनी घसरुन सेन्सेक्स 25 हजार 981 अंकावर स्थिरावला. या पडझडीत गुंतवणूकदारांचं तब्बल 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. मार्चमधील पडझडीतून सावरत सेन्सेक्सनं सात एप्रिल 2020 रोजी पुन्हा फिनिक्स भरारी घेतली. या दिवशी सेन्सेक्स दोन हजार 476 अंकांनी वधारला. कोरोना संकटात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार तातडीनं उपाययोजना करेल, असा विश्‍वास वाटू लागल्यानं गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केली. सरकारनं आत्मनिर्भर भारत अंतर्गत 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. या तेजीनं गुंतवणूकदारांचं नुकसान भरून निघालं. परदेशी संस्थात्मक गुंतणूकदार पुन्हा भारतीय बाजारांकडं वळाला.

कोरोना संकटातून सावरण्यासाठी जगातील बहुतांश देशांच्या मध्यवर्ती बँकांनी बाजारात पैसा ओतला. आर्थिक तरलता राखण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली. सरकारांनी विविध पॅकेजेसची घोषणा केली. अमेरिकच्या फेडरल रिझर्व्हनं तसंच रिझर्व्ह बँक आणि इतर केंद्रीय बँकांनी कोरोना काळात अर्थव्यवस्थेत रोकड तरलता वाढवण्यासाठी उपाय केले. त्यामुळं परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आत्मविश्‍वास दुणावला. भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आतापर्यंत बाजारात 20 अब्ज डॉलरची (1.5 लाख कोटी) गुंतवणूक केली. जो आतापर्यंतचा विक्रम आहे. याचा मोठा फायदा भारतीय कंपन्यांना झाला. परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानं परकीय चलन साठ्यातदेखील वाढ झाली. फायजर, मॉर्डना आणि एस्ट्राझेनका या कंपन्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं संशोधन करण्यात यश आलं. कंपन्यांनी कोरोना लस प्रभावी असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर भांडवली बाजारानं तेजीची वाट धरली. नऊ नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 29 सत्रांमधील 22 सत्रांमध्ये सेन्सेक्स विक्रमी स्तरावर बंद झाला. पूर्ण वर्षभरात सेन्सेक्स 24 टक्के वधारला तर निफ्टीनं 13 टक्के वाढ नोंदवली. मार्चमध्ये नीचांकी स्तर गाठणारे दोन्ही निर्देशांक 80 टक्क्यांनी वाढले आहेत. एकीकडे कोरोना आणि टाळेबंदीमुळं अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना रिलायन्स इंडस्ट्रीजनं मात्र रिलायन्स जिओमधील हिस्सा विक्रीचा सपाटा लावला. या काळात रिलायन्सनं परदेशी गुंतवणूकदारांकडून एक लाख कोटीहून अधिक निधी उभारला. फेसबुक, गुगल, सिल्व्हर लेक, मुबदला, केकेआर आणि सौदी अरेबियातील बड्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओमध्ये हिस्सा खरेदी केली. या निधीनं रिलायन्स इंडस्ट्रीजवरील कर्ज फेडलं गेलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल पहिल्यांदाच 15 लाख कोटींवर गेलं. ब्रिटनमध्ये चाहूल लागलेल्या नव्या कोरोनानं बाजाराला सप्ताहाच्या सुरुवातीलाच तडाखा दिला. लगोलग जाहीर झालेल्या निर्बंधांमुळे परत एकदा भयाचं वातावरण तयार होऊन बाजार घसरला आणि एका दिवसात गुंतवणूकदारांचे सात लाख कोटींचं नुकसान झालं. पुढच्या तीन दिवसांत बाजारानं कोरोनाची भीती बाजूला सारून आगेकूच सुरूच ठेवली. त्याला मुख्य हातभार लावला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं व युरोपातील ब्रेग्झिटचा तोडगा प्रत्यक्षात येण्याच्या बातमीनं. सोमवारचं सारं नुकसान भरून काढून बाजारातील प्रमुख निर्देशांक पुन्हा उच्चत्तम शिखराजवळ बंद झाले व गुंतवणूकदारांना या रूपानं नाताळाची भेट मिळाली. विप्रोनं आपल्या व्यवस्थापन चमूमध्ये केलेल्या मोठया बदलानंतर नवीन कंत्राटं मिळवण्यामध्ये जोरदार मुसुंडी मारली आहे. मेट्रो, ऑलिंपस, थॉटस्पॉट, फोर्टम व व्हेरिफोन अशा पाच परदेशी कंपन्यांची माहिती सेवा कंत्राटं कंपनीला मिळाली आहेत. त्यातील मेट्रोचं कंत्राट सर्वांत मोठं असून त्यामुळं कंपनीला युरोपमधील स्थान बळकट करता येईल. कंपनीच्या भविष्यातील उत्पन्नवाढीच्या अपेक्षा यामुळे वाढल्या आहेत. पूर्वापार कंपनी भागधारकांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ करत आली आहे.

इन्फोसिसनं डेमलर एजीबरोबर एक करार केल्याची घोषणा केली आहे. हा करार ‘आयटी इन्फ्रास्ट्रर ट्रान्सफॉर्मेशन’ प्रकारातील असून इन्फोसिस जर्मनी, उर्वरित युरोप, अमेरिका आणि विविध भौगोलिक भागात काम करणार्‍या डेमलरच्या कर्मचार्‍यांना सामावून घेईल. डॅमलर आणि इन्फोसिस संयुक्त भागीदारी तत्त्वावर वाहन उद्योगाला उपयुक्त ठरणार्‍या हायब्रिड क्लाऊड-चलित प्रणाली विकसित होईल. या भागीदारीमुळं डेमलर त्यांच्या वाहन उद्योगासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. इन्फोसिसनं या कराबाबतच्या आर्थिक बाबींवर भाष्य करणं टाळलं असलं, तरी इन्फोसिसला झिरो-ट्रस्ट नेटवर्क, स्मार्ट हायब्रिड क्लाऊड, मल्टी क्लाउड ट्रॅव्हल आणि व्यक्तिचलित आणि आज्ञात्मक ‘एआय’ या गोष्टींचा फायदा होईल. या कराराचा लगेचच फायदा होणार नसला, तरी वाहन उद्योगात इन्फोसिसचा दबदबा वाढेल. सलगपणे वर जाणार्‍या बाजारात येणारा मंदीचा तडाखा अशाच वेळी येतो, जेव्हा सर्व आलबेल वाटत असतं. त्याची चुणूक याच सप्ताहात पाहायला मिळाली. परदेशी गुंतवणूकदारांचा अखंड ओघ सुरू असल्यामुळं बाजार अशा वादळातून ‘सही सलामत’ बाहेर येत आहे. बाजारानं परत तेजीची वाटचाल सुरू होण्याचे संकेत दिले असले, तरी कोरोनाबाबतची कुठलीही नकारात्मक बातमी बाजारावर आघात करू शकते. सरत आलेल्या 2020 वर्षांनं शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांना तेजी-मंदीचा अनोखा अनुभव दिला. एका जागतिक संकटातून बाहेर येण्याआधीच बाजाराचे निर्देशांक वार्षिक तुलनेत 12 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वर गेले आहेत. इतर अनेक उद्योग व अर्थव्यवस्था बिकट अवस्थेमधून जाताना हा परतावा निश्‍चितच चांगला आहे. या वर्षांतील कोरोना महासाथीच्या संकटानं सर्वच उद्योगांना तंत्रस्नेही बनण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळं माहिती तंत्रज्ञान क्षेत्र गुंतवणुकीसाठी पुढील दोन ते तीन वर्षे आश्‍वासक राहाणार आहे. अन्न, वस्त्र आणि निवार्‍याच्या पलीकडं आरोग्य ही महत्त्वाची गरज समोर आली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचं प्रतिबिंब बँकिंग क्षेत्रात दिसून येत असतं. कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत असून ऑक्टोबरमध्ये नव्या नोकर्‍यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेत (ईपीएफओ) ऑक्टोबरमध्ये 11 लाख 55 हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. त्यामुळं अर्थव्यवस्था सावरत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचाही परिणाम भांडवली बाजारावर झाला आहे.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5731,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,186,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,123,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10275,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,699,देश,4414,नाशिक,801,पुणे,722,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16287,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13504,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3654,विदेश,650,संपादकीय,1538,सातारा,3195,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गुंतवणूकदारांच्या विश्‍वासावर स्वार झालेला बाजार
गुंतवणूकदारांच्या विश्‍वासावर स्वार झालेला बाजार
https://lh3.googleusercontent.com/-zs5D-YbuPUs/X-s6Dd7NFCI/AAAAAAABmJQ/yYwH8FCL7TwEAuyin-ccap8EFbW0j86mQCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-zs5D-YbuPUs/X-s6Dd7NFCI/AAAAAAABmJQ/yYwH8FCL7TwEAuyin-ccap8EFbW0j86mQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_3615.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_3615.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content