$type=ticker$snippet=hide$cate=0

पारनेर तहसिल परिसरातील अतिक्रमणावर तहसीलदारांचा हातोडा

पारनेर शहराने अनेक दिवसानंतर घेतला मोकळा श्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले समाधान आज रात्री सुरू राहणार अतिक्रमण काढण्याची मोहीम खरेदी व...

पारनेर शहराने अनेक दिवसानंतर घेतला मोकळा श्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले समाधान

आज रात्री सुरू राहणार अतिक्रमण काढण्याची मोहीम

खरेदी विक्री संघ बस स्टँड परिसर गणपती देवस्थान या ठिकाणची अतिक्रमणे रडारवर


पारनेर प्रतिनिधी - पारनेर शहरांतील तहसिल कार्यालयापरिसरातील अतिक्रमणामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने तहसिलदार ज्योती देवरे यांनी दि.२९ रोजी रात्री ९ च्या सुमारास येथील अतिक्रमणावर पोलिस बंदोबस्तात  हातोडा चालवला जेसीबीच्या सहाय्याने संबंधित अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले.
पारनेर शहरात अनेकांनी जागोजागी अतिक्रमण केले आहेत तहसिल कार्यालय भुमी अभिलेख पोलीस स्टेशन या परिसरामध्ये तालुक्‍यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे येथे स्थानिक व बाहेरील लोकांनी व्यवसायासाठी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे  केली होती हे अतिक्रमणे प्रशासना बरोबरच सर्वसामान्य जनतेची देखील डोकेदुखी बनत होते अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती सध्या तालुक्यातील 88 ग्रामपंचायत निवडणुका असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी याच परिसरामध्ये मोठी गर्दी होत होती तसेच येथे वाहतुकीस या गर्दीमुळे मोठा अडथळा निर्माण होत होता येथेच रस्त्याच्या दुतर्फा भागात झेरॉक्स हॉटेल कॉम्प्युटर केंद्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चे केंद्र आदी दुकाने थाटली होती या दुकानांवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी रात्रीतून जेसीबी फिरवला त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या परिसरामध्ये अतिक्रमण धारकांनी हैदोस मांडला होता त्यांच्या मनमानीमुळे नागरिक  हैराण झाले होते दुकानासमोर वाहने लावून न देणे  त्यामुळे रस्त्याच्या कडेला नागरिकांना वाहने लावावी लागत त्याने वाहतूक कोंडी होत असे त्यांच्या मगरूरी मुळे अनेकांना त्रास होत होता अतिक्रमणधारकांना वारंवार तोंडी सूचना करूनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही तहसीलदार ज्योती देवरे यांनी दि. २९ रोजी रात्री नऊच्या सुमारास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या सह पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली त्यानंतर अतिक्रमण धारकांची एकच धांदल उडाली त्यांच्याकडून अतिक्रमण काढण्यासाठी वेळ द्या अशी मागणी होत होती मात्र प्रशासनाकडून वेळ देऊनही या अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नसल्याने प्रशासनाने ती अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
तहसीलदार यांनी मध्यरात्री पर्यंत हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवली त्यामुळे शहरातील इतर भागातही अतिक्रमण मोहीम राबवली जाते का याबाबत त्या त्या परिसरातील अतिक्रमण धारक धास्तावले होते त्यांच्याकडून आपापली अतिक्रमण काढले जाणार असेल तर त्यातील वस्तू बाहेर काढण्याचे काम सुरू होते मात्र मध्यरात्री नंतर अतिक्रमण थांबवण्यात आले यापुढेही अशा प्रकारची अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनाकडून राबवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीनंतर अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली दिवसा वाहतुक थोपवणे अशक्य असल्याने रात्री काढण्यात आले काल दिवसभर गर्दीमुळे अतिक्रमण काढुन घ्या असे आवाहन ध्वनिक्षेपकावरुन करंण्यात येत होते मात्र प्रतिसाद दिला नाही पक्के बांधकामे असतील व ते अतिक्रमणा मध्ये मोडत असतील ते देखील निष्कसित करण्यात येणार आहेत तसेच नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायत च्या मुख्याधिकार्‍यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांचे वाहन व इतर शासकीय वाहने येण्यात येण्याचे देखील अडचणी निर्माण होत होत्या अतिक्रमण धारकांनी मनमानी पद्धतीने जागा मिळेल तिथे अतिक्रमण थाटली होती.
तहसील आवारामध्ये झेरॉक्स कॉम्प्युटर केंद्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चे केंद्र यामध्ये नागरिकांची वारेमाप लूट हे व्यावसायिक करत होते तहसिल कार्यालय मार्फत कोणत्याही प्रकारच्या दाखल्यांचे व संजय गांधी योजनेचे पैसे घेतले जात नाही परंतु  काही एजंटला हाताशी धरून अतिक्रमण करून दलाली यांनी सुरू केली  नागरिकांकडून विविध कामासाठी अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळण्याचे काम हे लोक करत होते  अतिक्रमण काढल्यामुळे सर्वसामान्यांची लूट यामुळे थांबली जाणार आहे.

ऑपरेटरने थाटली तहसीलच्या गेटवर टपरी तिची केली विक्री!
तहसील कार्यालय मध्ये ऑपरेटर म्हणून कामास असलेल्या गणेश औटी यांनी तर याबाबत हद्दच केली होती त्याने तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच टपरी टाकली होती काही प्रकरणात त्या ऑपरेटरची चौकशी सुरू झाली त्यानंतर त्याने ती टपरी ७० हजार रुपयाला विकून टाकली  हा प्रकार धक्कादायक होता अशाच प्रकारे पारनेरमध्ये अनेक जणांनी शासकीय जागेवर अतिक्रमणे केली आहेत व ती भाड्याने दिले आहेत यावर  पन्नास ते साठ हजार रुपये अतिक्रमण जागेवर कमवत आहेत हे विशेष!

अतिक्रमण धारकांचे अलिशान दुकाने !  
परिसरामध्ये अनेकांनी छोट्या-मोठ्या टपरी टाकून अतिक्रमणे केली होती तर काहींनी याच परिसरामध्ये अलिशान टपरी टाकल्या  यामध्ये कार्पोरेट दर्जाचे फर्निचर बसवण्यात आले होते एसी लावण्यात आला होता हे पाहून अतिक्रमण काढणारी यंत्रणाही थक्क झाली प्रशासनाने हे सर्व जमीनदोस्त केले आहेत.

 शहरातील अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावी त्यांचे प्रशासनाकडून स्वागत करण्यात येईल मात्र जी अतिक्रमण वारंवार सांगूनही काढली गेली नाहीत ते पोलीस बंदोबस्तात काढण्याचे काम केले जाणार आहे शासकीय जागेवर अतिक्रमण करून जनतेची लुट करत असणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

ज्योती देवरे
तहसिलदार 
-------------------------------------
तहसिलदार ज्योती देवरे यांनी अतिक्रमण धारकांवर धडक कारवाई केली आहे शहरातील बस स्टॅन्ड भागातील त्याचबरोबर खरेदी विक्री विक्री संघाला दिलेल्या शासकीय जागेत व्यावसायिकांनी गाळे व त्यामध्ये हॉटेल व आदी व्यवसाय थाटले आहेत त्यावर व बस स्टॅन्ड परिसरामध्ये असणाऱ्या रोड पासून पंधरा मीटर अंतरावरील सर्व टपऱ्या व दुकानावर आज रात्री हातोडा चालवला जाणार आहे गणपती देवस्थान जागेमध्ये हॉटेल बार  अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे अतिक्रमणमुक्त पारनेर करण्याचा इरादा तहसीलदार देवरे यांनी केला आहे.

--------------------------------------------
Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5567,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,12,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,665,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12590,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1472,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पारनेर तहसिल परिसरातील अतिक्रमणावर तहसीलदारांचा हातोडा
पारनेर तहसिल परिसरातील अतिक्रमणावर तहसीलदारांचा हातोडा
https://1.bp.blogspot.com/-qPoEicd6JRo/X-wgYl-OvPI/AAAAAAABmJc/3VGSU-MxG14jEA4ETEnRx97HnB7r1xtOwCLcBGAsYHQ/s320/IMG-20201230-WA0022.jpg
https://1.bp.blogspot.com/-qPoEicd6JRo/X-wgYl-OvPI/AAAAAAABmJc/3VGSU-MxG14jEA4ETEnRx97HnB7r1xtOwCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20201230-WA0022.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_362.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_362.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content