मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. सरनाईक यांच्या...
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. ज्या पाकिस्तानचे जगात क्रेडिट नाही त्यांचे क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करू, असा सवाल सरनाईक यांनी केला आहे.
सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की अभिनेत्री कंगनाने एक ट्वीट केले होते. त्यात ुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणार्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले आहे. तिच्या ट्वीटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकार्याने घरी काय सापडले, याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचे बदनामी करणे चुकीचं आहे. ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. कंगनाने माझ्याविरोधात खोटे ट्वीट केले. यामुळे कंगना तसेच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणार्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे.
कंगनाच्या ट्वीटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या, त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकार्यांची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीला सर्वतोपरी आम्ही सहकार्य करत आहोत. ज्या वेळी चौकशीची गरज असेल, शंका असतील त्या निरसन करण्यासाठी दोन तासात हजर राही असे मी ईडीच्या अधिकार्यांना सांगितले आहे. ईडीच्या अधिकार्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली आहेत आणि भविष्यातही देत राहीन, असे देखील सरनाईक म्हणाले.