मसूर / वार्ताहर : येथील पोलीस दूरक्षेत्रानजीक मसूर-शामगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीला ओलांडताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्या...
मसूर / वार्ताहर : येथील पोलीस दूरक्षेत्रानजीक मसूर-शामगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॉलीला ओलांडताना अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील ऊसतोडणी मजुराच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी बुधवारी घडली.
ऋतुजा महादेव सरवदे (वय 6, मूळ रा. वारोळा, ता. माजलगाव, जि. बीड, सध्या रा. मसूर) असे मृत मुलीचे नाव आहे. ऊसतोडणी मजूर महादेव विठ्ठल सरवदे हे पत्नीसह मुलीला घेऊन मोटारसायकलवरून चिखलीला ऊसतोडणीसाठी गेले होते.
शामगाव रस्त्याने मसूरकडे परतताना समोरून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वार पाठीमागून ओलांडताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटार सायकलला धडक दिली. त्या वेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाक अंगावरून गेल्याने ऋतुजा हिचा जागीच मृत्यू झाला. सहायक फौजदार तावरे घटनेचा अधिक तपास करत आहेत.