महारक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, ऑनलाईन व्याख्यान स्पर्धांचा समावेशःरामहरी मेटे बीड। प्रतिनिधीः- शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव म...
महारक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, ऑनलाईन व्याख्यान स्पर्धांचा समावेशःरामहरी मेटे
बीड। प्रतिनिधीः-
शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरात महारक्तदान शिबीर, स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे जेष्ठ नेते ऍड राहुल मस्के यांनी दिली आहे. हि सर्व उपक्रम टप्प्याटप्याने आयोजित करण्यात येणार आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीड शहरात दि 05 डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथपर्यंत सुभाष रोडवर सकाळी 9 वाजल्यापासून राबविण्यात येणार आहे. महारक्तदान शिबीर हे महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी चमन गार्डन परिसरात, भीमसृष्टीच्या नजीक सकाळी 8 वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदानात सहभाग घेऊ इच्छिणार्यांनी 7517606158/8956461573 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करायची आहे. ंसर्व उपक्रमांमध्ये कोरोनापासून बचावाची खबरदारी घेण्यात येणार आहे. शिवसंग्राम, बीडच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, स्वच्छता मोहिमेत बीडकरांनी यावे व उदयोन्मुख व्याख्याते, अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्त्यांनी ऑनलाईन व्याख्यान स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांनी केले आहे.