मुंबईमधील रुग्णालयांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील : राजेंद्र पाटील यड्रावकर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुवि...
मुंबईमधील रुग्णालयांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील : राजेंद्र पाटील यड्रावकर
महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा आणि सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न सरकारच्या वतीने सुरु असून सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबईस्थित रुग्णालयांच्या सुविधा वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.