राज्यात आज रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १७२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७० रुग्णांच...
राज्यात आज रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १७२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा संख्या १८ लाख ८० हजार ४१६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४८ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यातील ३ हजार ८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ५७ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ७४ हजार १०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख २ हजार ४५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८० हजार ४१६ (१६.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १२ हजार ५८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.