अकोले / प्रतिनिधी अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. केळी कोतुळ येथील ही...
अकोले / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. केळी कोतुळ येथील ही विद्यार्थिनी असून ती शासकीय आश्रम शाळा केळी कोतुळ येथे ११ वी च्या वर्गात शिकते. लॉकडाऊन मुळे शाळा सध्या बंद असल्याने ती पळसूदे येथे आपल्या आजीकडे सुट्टीला गेली होती. या शनिवारी रात्री पळसुंदे येथून रात्री तीला दोघा तरुणांनी मोटारसायकलवर पळवून नेले त्याना आजीने अडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सुसाट वेगाने या मुलीला घेऊन पळ काढला दुसऱ्या दिवशी मुलीचे वडीलांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली फिर्यादी वरून पोलिसांनी वाघापूर येथील सोमनाथ एकनाथ शेंगाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद अकोले पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून त्याच्या वर अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान या पूर्वी भाऊबीजेच्या दिवशी देखील याच मुलीचे तिच्या राहत्या घरून केळी-कोतुळ येथून तिला पळवून नेले होते त्यावेळी तिचा शोध घेतल्यानंतर तिने मी स्वतःहून त्याच्या बरोबर गेली होते असा जबाब पोलिसांना दिला होता. त्यानंतर तिला घरी आणले होते मात्र शनिवारी तिला पुन्हा पळवून नेल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या तपासा विषयी शंका व्यक्त केली जात आहे. सोळा वर्षाची या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक तरुण तिला प्रलोभन दाखवून व तिच्या कडून पोलिसांना खोटे वदवून घेत आहे व तिचे वारंवार अपहरण करत असल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला मात्र पोलीस चुकीच्या पद्धतीने त्या मुलाला साथ देत असल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.