पारनेर/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील निघोज येथील संदिप वराळ हत्या प्रकरणातील कटाचा आरोप असतेल्या बबन कवादचा जामीन रद्दसाठी होण्यासाठी फि...
पारनेर/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील निघोज येथील संदिप वराळ हत्या प्रकरणातील कटाचा आरोप असतेल्या बबन कवादचा जामीन रद्दसाठी होण्यासाठी फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावनी औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती विभा कंकनवाड यांच्या समोर झाली. पुढील पाच जानेवारीला याबाबत न्यायालय निकाल देणार आहे. बबन कवाद सध्या जामीनावर बाहेर आहे. यापूर्वीच कवाद यांच्या जामीनावर पोलिसांनीही आक्षेप घेतला आहे. या हत्याप्रकरणाचा चुकीचा तपास झाल्याचे यापुर्वीच समोर आले आहे. या खटल्यातील तपासी अधिकारी तथा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांना बनावट तपास केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतर भोईटे यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे.