सर्व शासकीय कार्यालय,शहर सफाई, सनेटाईज व पाच हजार वह्यांचे वितरणाने सप्ताहाची सांगता परळी वै..। प्रतिनिधीः- देशाचे माजी कृषीमंञी तथा राष्ट्र...
सर्व शासकीय कार्यालय,शहर सफाई, सनेटाईज व पाच हजार वह्यांचे वितरणाने सप्ताहाची सांगता
परळी वै..। प्रतिनिधीः-
देशाचे माजी कृषीमंञी तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा परळी नगर परिषदेच्या वतिने व सामाजिक न्यायमंञी तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली व गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ परळी,सुंदर परळी सप्ताह घेऊन मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करुन आज सप्ताहाची सांगता करण्यात आल्याची माहिती स्वच्छता व आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी दिली. ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवसा निमित्त घेण्यात येणार्या स्वछता अभियानचा आज सातव्या दिवशी पोलीस स्टेशन येथे स्वछता करून, पाच हजार वह्याचे वाटप करून अभियान चा समारोप करण्यात आला.या वेळी नगरसेवक .अयुब भाई पठाण, विनोद जगतकर सर,सिराज भाई, युवानेते शंकर वाकडे, पत्रकार यांच्या उपस्थिती मध्ये अभियान संपन्न झाले.
आज संपूर्ण पोलीस स्टेशन पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या मार्फत पाच हजार वह्या चे वाटप स्वछता कामगारांना वाटप करण्यात आले. हे अभियान परळी शहरात मध्ये सात दिवस राबविण्यात आले यामध्ये शहरातील सर्व शासकीय कार्यलय ,विहारा मध्ये सोडीयम हायकोक्लोराईडची फवारणी, स्वछता, काटेरी झाडे कापणे, नाली सफाई आदी स्वछता या अभियान मध्ये राबविण्यात आली. समारोप अभियाना मध्ये .अयुब भाई पठाण, नगरसेवक, मा. विनोद जगतकर, सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष, सिराज भाई, रा. काँग्रेस उपाध्यक्ष, शंकर वाकडे, युवानेते यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून व पाच हजार वह्या चे सफाई कामगार यांना वाटप करण्यात आले व पोलीस स्टेशन येथे स्वछता करण्यात आली. तर प्रमुख उपस्थिती अभियान चे आयोजक किशोर पारधे, स्वछता व आरोग्य सभापती, स्वछता निरीक्षक शंकर भाऊ साळवे, स्वछता निरीक्षक श्रवण घाटे,अमोल कानडे, संजय गांधी निराधार सदस्य, रामभाऊ ढेंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते, अमोलजी सूर्यवंशी, युवा नेते विश्व्जीत कांबळे,अदोडे वहिनी,राष्ट्रवादी काँग्रेस महिला नेत्यां, अशोक भाऊ दहिवडे, आकाश गायकवाड, प्रवीण दहिवडे, कुमार दहिवडे, विजय गायकवाड, अमोल शिंदे, रामभाऊ ढेंगळे, बाबासाहेब गायकवाड, रोहित अदोडे, दगडू सेठ मस्के, गंगा मस्के,अशोक भाऊ जगतकर, सुरेश वाल्मिकी, दयानंद रोडे, अनिल आवचारे ,लक्ष्मण हजारें,दिनेश पवार, गंगा मस्के, व आदी जण स्वछता अभियानास सुरवात करण्यासाठी हजर होते.या अभियान मध्ये मा.अरविंद मुंडे,मुख्याधिकारी न. पचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,श्रवण घाटे, स्वछता निरीक्षक शंकर साळवे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रम चे सूत्रसंचालन विश्व्जीत कांबळे यांनी केले तर आभार स्वछता अभियान चे शंकर भाऊ साळवे (स्वछता निरीक्षक ) यांनी केले.