बीड । प्रतिनिधीः- रात्री आपले कर्तव्य बजावून सकाळी घरी परतणार्या महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या पिकअपने जोराची धडक दिल्य...
बीड । प्रतिनिधीः-
रात्री आपले कर्तव्य बजावून सकाळी घरी परतणार्या महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी रामनगर येथील बायपासवर घडली. पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर रात्री तांदळे व राख हे ड्युटीला होते. सकाळी ड्युटी करूनते दुचाकी क्र. एम.एच. 23 ए.झेड. 6658 ने बीडकडे येत असताना रामनगर येथील बायपास चौकात त्यांच्या दुचाकीला पिकअप क्र. जी.जे. 27 एक्स-6946 ने जोराची धडक दिली. या अपघातात तांदळे व राख हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.