तहसील कार्यालयात दि 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बीड। प्रतिनिधीः- बीड तालुक्यातील जनता व पदाधिकारी,सरपंच,ग्रामपंचायत सदस्यानी 7 डिसेंबर 20...
तहसील कार्यालयात दि 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता
बीड। प्रतिनिधीः-
बीड तालुक्यातील जनता व पदाधिकारी,सरपंच,ग्रामपंचायत सदस्यानी 7 डिसेंबर 2020 रोजी तहसील कार्यालयातील मिटींग हॉल येथे दुपारी 3.00 वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना तहसीलदार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहेत.
बीड तालुक्यातील एकूण 175 ग्रामपंचायती मधून 2020-2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत वरील ठिकाणी होणार आहे. बीड तालुयातील ग्रामपंचायत संख्या 175असून अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे 21, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे 02, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे 47, खुल्या प्रवर्गासाठी सरपंच पदे 105 अशी आहेत.