$type=ticker$snippet=hide$cate=0

म्हसवडच्या श्री सिध्दनाथ यात्रा नियोजनाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष

  म्हसवड / वार्ताहर : म्हसवडचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव केवळ आठवड्यावर य...

 




म्हसवड / वार्ताहर : म्हसवडचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव केवळ आठवड्यावर येऊन ठेपला तरी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे येथील यात्रेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आसल्यचे सर्वत्र बोलले जात आहे.

दरवर्षी यात्रेच्या अगोदर सुमारे 15 दिवस प्रांतांच्या दोन बैठका व शेवटी जिल्हाधिकार्‍यांची बैठक होऊन यात्रेचे नियोजन केले जाते. मात्र, आता ही यात्रा एक आठवड्यावर येऊन ठेपली तरी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे हालचाल अथवा बैठकीचे नियोजन करण्यात आले नाही. यावरून यात्रेबाबत प्रशासनाचे  दुर्लक्ष झाले असल्याचे येथील व्यापारी, भाविक, मानकरी, नागरिक यांच्यात बोलले जात असून नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

दरवर्षी सहा ते सात लाख भाविकांच्या उपस्थितीत येथील रथयात्रा मोठ्या उत्साहात भरत असते. अनेक ठिकाणाहून आपला व्यवसाय करण्यासाठी अनेक छोटे-मोठे व्यापारी याठिकाणी आपला सर्व सराजम घेऊन यात्रेपूर्वी दहा ते बारा दिवस अगोदर येतात. शिवाय येथील स्थानिक व्यापार्‍यांनाही यात्रेचा आवश्यक असणारा माल भरून ठेवावा लागतो. येथे गुलाल-खोबरे उधळण्याची पध्दत असल्याने व्यापारी वर्गाकडे गुलाल सुके खोबरे तसेच नारळाचे मोठे साठे तयार करून ठेवावे लागतात. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सिध्दनाथांचा रथोत्सव या वर्षी 15 डिसेंबर रोजी होत आहे. सातारा जिल्ह्यातील यात्रेचा हंगाम हा येथील श्री सिध्दनाथ यात्रेपासून सुरू होत असतो. येथील यात्रेवरच अनेकांचे जनजीवन, आर्थिक उलाढाल सुरू असते. त्यामुळे येथील यात्रेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. 

यंदाच्या यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने यंदाची यात्रा भरणार की नाही? याबाबतचा निर्णय अद्यापही प्रशासनाने घेतलेला नाही. खरेतर दरवर्षी यात्रेपूर्वी किमान 15 दिवस अगोदर प्रांताधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात एक बैठक होत असते. त्यामध्ये यात्रेच्या निमित्ताने काही सूचना, नियम, अटी इत्यादींचे मार्गदर्शन केले जाते. यात्रेच्या अगोदर पुन्हा आठ दिवसाने जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जाते. त्यामध्ये मागील बैठकीचा आढावा संबंधित विभागाकडून घेतला जातो व यात्रेची संपूर्ण नियोजनाची तयारी प्रत्येक विभागाकडून झाली का नाही. याची तपासणी त्या-त्या विभाग प्रमुखांकडून करून घेतली जाते. परंतू यंदा मात्र अद्याप एकही बैठक प्रांताधिकार्‍यांनी घेतली नसल्याने सर्वत्र संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाची श्रींची रथयात्रा भरणार की नाही याबाबत सर्वांच्या मध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. ही रथयात्रा भरणार की नाही याचा निर्णय अद्यापही प्रशासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे व्यापारी भाविक नागरिकांच्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी मोठ्या देवस्थानबाबतची सर्व जबाबदारी तेथील ट्रस्टींंवर सोपवली आहे. त्यामुळे येथील मंदिर ट्रस्टींना कोणत्या स्वरूपाचे नियोजन करावे याचाही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालून येथील यात्रेबाबत काय तो निर्णय तातडीने घ्यावा, अशी आग्रही मागणी येथील तमाम व्यापारी वर्ग, बाहेरील भाविक भक्त, मानकरी तसेच परगाव वरून येणारे छोटे-मोठे व्यापारी यांचेकडून वारंवार केली जात आहे.

Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10334,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16434,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13676,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: म्हसवडच्या श्री सिध्दनाथ यात्रा नियोजनाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष
म्हसवडच्या श्री सिध्दनाथ यात्रा नियोजनाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष
https://i.ytimg.com/vi/UXcaDFODsG4/hqdefault.jpg
https://i.ytimg.com/vi/UXcaDFODsG4/default.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_401.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_401.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content