$type=ticker$snippet=hide$cate=0

पाकीस्तानातून दिव्यांग गीता पोहचली नाशिकरोड पोलीस ठाण्यात

नाशिकरोड प्रतिनिधी :  पाकिस्तानातून आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी मूकबधीर गीता नाशिकरोडला दाखल झाली आहे. एकलहरेमधील रमेश सोळसे यांनी गीता ...


नाशिकरोड प्रतिनिधी : पाकिस्तानातून आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी मूकबधीर गीता नाशिकरोडला दाखल झाली आहे. एकलहरेमधील रमेश सोळसे यांनी गीता आपली कन्या असून लहानपणी तिच्या आईने गीताला रेल्वेत सोडून दिल्याचे दावा केला आहे.

त्यांनी याआधीही ती आपली कन्या असल्याचा दावा केला होता. त्यांचा डीएनए निगेटिव्ह आल्यानंतर पत्नीचा डीएनए तपासावा असे रमेश यांचे म्हणणं आहे. दरम्यान, इंदोरचे एनजीओ सकाळी गीताला येवला येथे मूळ आईकडे नेणार आहे. उद्या गीताच्या आईचा डीएनए टेस्ट करणार असल्याचे समजते. गीताला नाशिकरोडचे सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, आकाश भालेराव, गणेश उन्हवणे मदत करत आहेत.

गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती. दिवंगत परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती २६ऑक्टोबर  २०१५ रोजी भारतात परतली. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील सुमारे वीस कुटुंबांनी गीताला त्यांची हरवलेली मुलगी असल्याचा दावा केला होता.


रेल्वेमार्गे दिल्लीला

गीता ही नाशिकरोड मार्गाने दिल्ली आणि नंतर लाहोरला पोहचली असावी असा अंदाज रमेश यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश यांनी गीताचा जन्मदाखला दाखवत गीताला गावाची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीताचे समाधान झाले नाही. आपले घर हे रेल्वेस्थानकाच्या बाजूला मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचे गीताचे म्हणणं आहे. तसेच शेतामध्ये ऊस आणि भुईमुगाचे पीक असल्याचे वर्णन ती करते.


पोलीस ठाण्यात

रमेश सोळसे यांचा दावा तपासण्यासाठी गीता व सामाजिक कार्यकर्ते नाशिकरोड पोलिस ठाण्यात आज गेले. वरिष्ठ निरीक्षक सूरज बीजली यांनी सत्य तपासण्यासाठी रमेश यांच्या पत्नीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रमेश यांची पत्नी शोभाने दुसरा विवाह केला असून, ती गीतासमोर आल्यास गीताची ओळख पटू शकते. पाकिस्तानातून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात नाशिकमध्ये


गीताचे हावभाव आणि इशाऱयावरून तिच्या कुटुंबाचा घेतला जात

आहे. मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. गीता ही तेलुगू अभिनेता महेश बाबूची फॅन आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. लहानपणीच्या आठवणींव्दारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड,परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात नेले गेले. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10049,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15564,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12675,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पाकीस्तानातून दिव्यांग गीता पोहचली नाशिकरोड पोलीस ठाण्यात
पाकीस्तानातून दिव्यांग गीता पोहचली नाशिकरोड पोलीस ठाण्यात
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_402.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_402.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content