$type=ticker$snippet=hide$cate=0

चटका लावून जाणारी एक्झिट!

   काँग्रेस सध्या संकटातून जात आहे. पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं जात आहे. पक्षाला एक वर्षापासून अध्यक्ष नाही. निष्ठावंतांची संख्या कमी ...

 




 काँग्रेस सध्या संकटातून जात आहे. पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं जात आहे. पक्षाला एक वर्षापासून अध्यक्ष नाही. निष्ठावंतांची संख्या कमी झाली आहे. अशा वेळी अहमद पटेल, मोतीलाल व्होरा यांच्यासारख्यांनी एकाच महिन्याच्या अंतरानं या जगातून निरोप घ्यावा, हा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विश्‍वासानं एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवावी आणि ती त्यांनी निष्ठेनं पार पाडावी, असे हात कमी व्हायला लागले आहेत.

काँग्रेस हा देशातील सर्वांत जुना पक्ष आहे. 135 वर्षांचा हा पक्ष. त्याच्या उभारणीत अनेक नेत्यांचा मोठा वाटा आहे. अशा पक्षाला गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं परभवाला सामोरं जावं लागत आहे. जनतेशी काँग्रेसची नाळ तुटत चालली आहे.

काँग्रेस आणि गांधी परिवारातही अंतर पडत चाललं आहे. हे अंतर कमी करण्याचं आणि दोन्हींत सेतू बनून राहण्याचं काम अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा यांच्यासारखे निष्ठांवत इमाने इतबारे करीत होते. वैयक्तिक स्वार्थाला त्यांनी कधीही थारा दिलेला नव्हता. अशा निष्ठावंतांच्या साखळीतील दोन कड्या एका महिन्याच्या अंतरानं गळून पडल्या आहेत. काँग्रेसवर हा फार मोठा आघात आहे. काँग्रेसचा वटवृक्ष उभा करण्यात ज्या काही मान्यवरांचा समावेश होता, त्यात अहमद पटेल आणि मोतीलाल व्होरा यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यातही चटका लावून जाणारी बाब म्हणजे व्होरा यांनी अगोदरच्या दिवशी 93 वा वाढदिवस साजरा केला आणि दुसर्‍या दिवशी या जगाचा निरोप घेतला. कोरोनावर मात केल्यानंतरही मृत्यू गाठतोच, हा अनुभव अनेकांना आला. तोच व्होरा यांनाही आला. दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र वृद्धापकाळ आणि मूत्रपिंडाचा त्रास यामुळं उपचार सुरू असताना त्यांचं निधन झाले. ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाचा संसर्गदेखील झाला होता; मात्र योग्य उपचाराच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात कोली होती. बही, खाता नही, केसरी कहे वही सही, असं सीताराम केसरी म्हणायचे. ते काँग्रेसचे बरीच वर्षे खजिनदार होते. नंतर ते अध्यक्षही झाले; परंतु त्यांना कोणी गांभीर्यानं घेत नव्हतं. तसेच त्यांच्या बाबतीत विश्‍वास ठेवावा, अशी परिस्थिती नव्हती. व्होरा यांच्याबाबतीत मात्र तसं नव्हतं. पक्षाचा खजिना सांभाळण्याचं काम त्यांनी प्रदीर्घ काळ केलं; परंतु संशय घ्यावा, असं वर्तन त्यांनी कधीच केलं नाही. छत्तीसगडमध्ये जन्मलेल्या व्होरा यांची राजकीय कारकीर्द मध्य प्रदेशात आणि दिल्लीत घडली. व्होरा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठं नाव होतं. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. सुरुवातीची काही काळ त्यांनी पत्रकार म्हणून काम केलं. पत्रकार असतानाही त्यांनी अनेक विषय हाताळले. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाचा एक स्वतंत्र वाचक तयार झाला होता. त्यांच्या राजकारणाची सुरुवात प्रजा समाजवादी पक्षापासून झाली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. प्रजासमाजवादी पक्ष, काँग्रेस हा त्यांचा प्रवास झाला; परंतु नंतरच्या आयुष्यात त्यांनी काँग्रेस सोडून अन्य पक्षांचा कधीच विचार केला नाही. 1972 मधील विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी मध्य प्रदेशाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. लगेच दोन वर्षांनी म्हणजेच 1985 साली त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा केंद्रीय राजकारणाकडे वळवला. त्यानंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कामं केलं.

काँग्रेसमध्ये अनेक पदं भूषवूनही काँग्रेसचे खजिनदार म्हणून म्हणून त्यांनी केलेलं काम हीच त्यांची ओळख जास्त काळ राहिली.  हे पद त्यांनी निष्ठेनं सांभाळले. अनेक वर्षे हे पद सांभाळल्यानंतर, 2018 मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हे पद सोडलं. त्यामुळं काँग्रेसनं हे पद अहमद पटेल यांच्याकडे सोपवलं. काँग्रेसवर अविचल निष्ठा आणि गांधी कुटुंबाशी कौटुंबिक संबंध असलेल्या व्होरा यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचं उमेदावर घोषित करा, अशी मागणी केली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबर त्यांनाही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात न्यायालयाची पायरी चढावी लागली. अजून या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलेला नाही. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून ते रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. हे त्यांना मिळालेलं पहिलं पद होतं. त्यानंतर मोतीलाल व्होरा यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. पुढं सलग तीन वेळा ते आमदार झाले. व्होरा यांना 1983 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाबरोबर मध्य प्रदेश काँग्रेस काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं. अनेक महत्त्वाची पदं भूषवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद खुणावत होतं. अखेर 13 फेब्रुवारी 1985 रोजी ते मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यांनी जवळपास तीन वर्षे मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं. त्यानंतर त्यांना काँग्रेसनं केंद्रात पाचारण केलं. 14 फेब्रुवारी 1988 रोजी व्होरा यांच्याकडं केंद्रात कुटुंब कल्याण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. केंद्रात मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर दोनच महिन्यांत व्होरा राज्यसभेचे सदस्य झाले. व्होरा हे 26 मे 1993 ते 3 मे 1996 पर्यंत उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. 1998 च्या लोकसभेमध्ये राजनांदगाव या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. व्होरा हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोनिया गांधी यांचे विश्‍वासू म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसच्या अनेक निर्णय प्रक्रियेत त्यांचं मत महत्त्वाचं ठरत होतं. एकीकडे काँग्रेसशी जवळीक आणि दुसरीकडं गांधी घराण्याशी संबंधित नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र संपत्ती वादातही मोतीलाल व्होरा यांचं नाव होतं.

असोसिएट जर्नल्स लिमिटेड, यंग इंडियन आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी या तिन्ही संस्थांमध्ये व्होरा यांना वरचं स्थान होतं. मोतीलाल व्होरा हे 22 मार्च 2002 रोजी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालक होते. त्याआधी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्याकडं असोसिएटेड प्रेसचे 12 टक्के शेअर्स होते.

उत्तर प्रदेशचं राज्यपाल असताना व्होरा यांनी राजभवनात जुनं मंदिर आणि कबरीचं पुन्हा डिझाइन करण्याचं काम केलं. तेे दिवसभर काम करत असत. राज्यपालांच्या कार्यकाळातही ते जनतेला भेटायचे. राज्यपालांच्या कार्यकाळात व्होरा यांनी गोमती नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. शहरातील दूषित पाणीपुरवठ्याबाबत माहिती मिळताच बोरा पथकांसह गोमती नदीवर पोहोचले. घाणीनं भरलेली गोमती नदी पाहून त्यांनी अधिकार्‍यांना सांगितलं, की त्यांनी गोमती नदीचं पाणी प्यावं, जेणेकरुन शहरवासीय कोणत्या प्रकारचं पाणी नागरिक पितात हे त्यांना कळेल. त्या वेळी जलसंचय विभागातील अभियंता राजीव वाजपेयी म्हणायचे, की गोमती नदीच्या वाईट परिस्थितीवर व्होरा खूप रागावले होते. वास्तविक, त्या वेळी गोमती नदी कोरडी पडली होती. शहरातून येणारं सांडपाणी थेट नदीत मिसळत होतं. बॅरेज गेट बंद झाल्यामुळं गौळघाट पंपिंग स्टेशनमधून ऐश्‍वरबा पाण्याच्या टाकीला दिलं जाणारं पाणी घाण होतं आणि उपचार करूनही घरांपर्यंत पोचलेलं पाणी स्वच्छ नव्हतं. राष्ट्रपती राजवटीत ते अत्यंत सक्रिय होते. ते प्रत्येक निर्णय स्वत: घेत. राजभवनच्या दालनाला त्यांनी गांधी हॉल असं नाव दिलं. तिथं रामधून वाजविण्याची सुरुवात केली. त्यांचा भर विकासावर होता. लखनऊमध्ये गांधी सेतू बांधला. पाण्याच्या तिसर्‍या टाकीचं भूमिपूजन केलं. हुसाडिया क्रॉसरोड येथे मंडी परिषदेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात व्होरा यांनी गोमती नगर तसंच गांधी सेतू यांना जोडण्यासाठी पूल बांधण्याची घोषणा केली.

विकासाचं राजकारण करणार्‍या नेत्यांपैकी ते होते. त्यांनी राजकीय गटबाजीला कधीच थारा दिला नाही. पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्तीयांत असतानाही त्यांनी कधी त्याचा फायदा घेतला नाही. व्होरा यांनी कायम पक्षाला योग्य तोच सल्ला दिला. गांधी परिवारातील तीन पिढ्यांशी त्यांचे चांगले संबंध राहिले. विश्‍वास आणि एकनिष्ठतेच्या जोरावर ते किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. किंग आणि किंगमेकर अशा दोन्ही भूमिका त्यांनी लीलया वठवल्या. काँग्रेसला त्यांच्यासारख्या निष्ठावंतांची गरज असताना निष्ठावंत या जगाचा निरोप घेत आहेत.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5572,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10029,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,619,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15511,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12620,महाराष्ट्र सातारा,34,मुंबई,3472,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3168,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: चटका लावून जाणारी एक्झिट!
चटका लावून जाणारी एक्झिट!
https://lh3.googleusercontent.com/-4An0puTJzTY/X-IFVrue69I/AAAAAAABmGg/KOoQ6AXvlogSTydUNl2MjsqR-2rR7u2ggCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-4An0puTJzTY/X-IFVrue69I/AAAAAAABmGg/KOoQ6AXvlogSTydUNl2MjsqR-2rR7u2ggCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_404.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_404.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content