$type=ticker$snippet=hide$cate=0

कमल हसन-ओवेसी यांची तमिळनाडूत युती

चेन्नईः बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एक प्रबळ दावेदार म्हणून समोर आल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिसे इत्तहादुल मुस्लिमीन अर...



चेन्नईः बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एक प्रबळ दावेदार म्हणून समोर आल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिसे इत्तहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएम पक्षाने आता येत्या वर्षात होऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका लढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांच्या मक्कल निधी मैनम, अर्थात एमएनएमपक्षासोबत युती करत किमान 25 जागा लढवण्याची त्यांची तयारी असल्याचे समजते.


ओवेसी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितल्यानुसार, येत्या वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांत एमआयएम 25 तरी जागा लढवणार आहे. कमल हासन यांच्या ’एमएनएम’ सोबत संभाव्य युतीबाबत बोलणी सुरू असल्याचीही माहिती सूत्रांकडून कळते आहे. पक्ष त्रिची आणि चेन्नई या दोन ठिकाणी सभांचे आयोजन करणार आहे. असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हासन यांनी सोमवारीच त्यांचा पक्ष या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. मी कुठल्या मतदारसंघातून लढेल याबाबत लवकरच कळवणार असल्याचेही ते बोलले.


ओवेसी आणि हासन यांच्यात यापूर्वीच एकवाक्यता आढळून आली होती, जेव्हा हासन यांच्या एका वक्तव्याला ओवेसी यांनी पाठिंबा दिला होता. महात्मा गांधींचा खून करणार्‍या नथुराम गोडसे याला दहशतवादी म्हटले जावे, असे ते वक्तव्य होते. बिहार निवडणुकांत पाच मुस्लिमबहुल मतदारसंघांत मोठा विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिल्याने एमआयएम सध्या फॉर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हैदराबाद स्थानिक निवडणुकांमध्येही भाजपसमोर  कडवे आव्हान उभे करत एमआयएमने दुसरा क्रमांक राखला.

2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडूतली मुस्लिम लोकसंख्येचा टक्का 5.86 इतका असून तिथेही यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत ओवेसी यांनी कंबर कसलीय. एआयएमआयएमच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष वकील अहमद यांनी त्यांचा पक्ष कुठल्या जागा लढवायच्या हे ठरवायला राज्यात सर्वेक्षण करत होता. द्रविड मुन्नेत्र कझगम (डीएमके)सोबतही त्यांनी बोलणी केली होती; मात्र काही निरोप आला नाही. ऑल इंडिया अण्णा मुन्नेत्र कझगम (एआयडीएमके) तर भाजपसोबत असल्याने त्यांच्यासोबत जाण्यास आम्ही नकार दिला.

Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4133,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15279,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12360,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3421,विदेश,635,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कमल हसन-ओवेसी यांची तमिळनाडूत युती
कमल हसन-ओवेसी यांची तमिळनाडूत युती
https://i0.wp.com/hindi.opindia.com/wp-content/uploads/sites/6/2020/12/Opindia-Images-2020-12-14T150338.960.jpg?resize=696%2C398&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_411.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_411.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content