सातारा / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण गोरख पिटेकर (वय 29, रा. बुधवार नाका झोपडपट्टी) याला विशेष अतिर...
सातारा / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण गोरख पिटेकर (वय 29, रा. बुधवार नाका झोपडपट्टी) याला विशेष अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी पोक्सो कायद्यानुसार 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
19 मे 2014 रोजी लक्ष्मण याने एका अल्पवयीन मुलाला दुचाकीवरून करंजे हद्दीत नेऊन अनैसर्गिक अत्याचार केला होता. याबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या समोर सुनावणी झाली. फिर्यादी व पीडित मुलाच्या वैद्यकीय अहवालावरून डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील अजित साबळे-कदम यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून पटणी यांनी लक्ष्मणला बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार 7 वर्षे सक्तमजुरी, 1 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
....................