बीड । प्रतिनिधीः शिवाजीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन ऍपे रिक्षे पकडले होते. या दोन्ही रिक्षांचे नंबर एकच असल्याचे समोर आले होते. या प...
बीड । प्रतिनिधीः शिवाजीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन ऍपे रिक्षे पकडले होते. या दोन्ही रिक्षांचे नंबर एकच असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू होता. हे कनेक्शन सोलापूरशी असल्याचे समोर आले. ज्या एजंटकडून या दोघांनी रिक्षा घेतले त्या एजंटने अफरातफर करत एकच नंबर टाकल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी काही रिक्षे ताब्यात घेतले होते. त्यातील दोन रिक्षांचे नंबर एकसारखेच असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस चांगलेच चक्रावून गेले होते. या प्रकरणाचा तपास केला असता हे दोन्ही रिक्षे सोलापूरहून खरेदी करण्यात आले. एक रिक्षा केजचा तर एक ढेकणमोह येथील आहे. संबंधित एजंटाने एका रिक्षाचा चेसीज नंबर बंदलला तर एका रिक्षाकडे कागदपत्र नसल्याचे समोर आले. एजंटाकडूनच हा नंबरचा घोळ करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.