मुंबई/प्रतिनिधी : प्रेमभंग झाल्याने एका तरुणाने आपल्या जुन्या गर्लफेण्डच्या बॉयफ्रेण्डला धमकावण्यासाठी चक्क हवेत गोळीबार केल्याची घटना मुंब...
मुंबई/प्रतिनिधी :
प्रेमभंग झाल्याने एका तरुणाने आपल्या जुन्या गर्लफेण्डच्या बॉयफ्रेण्डला धमकावण्यासाठी चक्क हवेत गोळीबार केल्याची घटना मुंबईतीलव वर्सोवा येथे घडली आहे. या प्रकरणात हवेत गोळीबार करणाऱ्या अल्ताफ हुसैन सय्यद 36 वर्ष आणि वसीम शेख, 30 वर्ष या दोघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केलेआहे. यादोघांना पोलिसांनी धमकावणे, गोळीबार करणे या गुन्ह्याखाली अटक केल आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी अल्ताफचे एका 35 वर्षीय महिलेसोबत गेले 8 वर्षे प्रेमसंबंध होते. एका वर्षापूर्वी या दोघांत भांडण झालं आणि ते वेगळे झाले. या दरम्यान त्या महिलेचा संबंध वसोवा येथे राहणाऱ्या एका उद्योगपतीशी आला आणि त्या दोघांत जवळीकता वाढत गेली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रऊफ शेख यांनी सांगितलं की 26 डिसेंबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अल्ताफ आपल्या एका मित्राच्या सोबतीनं वर्सोव्यातील त्या उद्योगपतीच्या घरी पोहचला. तिथं त्याला समजलं की तो उद्योगपती लोणावळा येथे गेला आहे. त्यावेळी आरोपीनं उद्योगपतीच्या दोघा भावांना धमकावलं. नंतर आरोपीनं हवेत गोळीबार केला.
या घटनेनंतर संबंधित परिवार भितीच्या छायेखाली होता. त्यांनी या घटनेची माहिती वर्सोवा पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी अल्ताफ आणि त्याच्या मित्राचा शोध सुरु केला. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे स्कॅन करुन मोबाइल टॉवरच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना माहिममधून अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी गावठी कट्टा जप्त केला. हा गावठी कट्टा आरोपीकडे कसा आला आणि आरोपीची पार्श्वभूमी काय आहे याचा पोलीस तपास करत आहेत.