देवळा ; भिलवाड ता देवळा येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण...

देवळा ; भिलवाड ता देवळा येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिलवाड ता देवळा शिवारात बुधवारी (दि 2)रोजी सांयकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास रोहिणी बळीराम जाधव (३२) ही महिला विहिरीतून पाणी काढत असतांना पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडवून तिचा मृत्यू झाला. विहिरीला पाणी जास्त असल्याने या महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी विहिरीतील संपूर्ण पाण्याचा उपसा करण्यात येऊन आज गुरुवारी दि ३ रोजी दुपारी १वाजता रोहिणी जाधवचा मृतदेह बाहेर काढण्यात आला . या घटनेमुळे भिलवाड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात पती , एक मुलगा , सासू ,सासरे असा परिवार आहे . देवळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ,अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एल के धोक्रट करीत आहेत.