मुंबई / प्रतिनिधी ः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईकांचीही...
मुंबई / प्रतिनिधी ः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईकांचीही ईडी चौकशी करणार असून त्यांना उद्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणी सरनाईक सध्या ईडीच्या फेर्यात अडकले आहेत. तसेच त्यांचा मुलगा विहंग सरनाईकही ईडीच्या रडारवर आहे. अशातच त्यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या पाठोपाठ पुर्वेश सरनाईक यांचीही चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने आ. सरनाईक यांच्या घरी धाड टाकली होती. त्या धाडीमध्ये ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे सांगण्यात येत होते; मात्र आपल्या घरात कोणतेही पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले नसल्याचं स्पष्टीकरण आ. सरनाईक यांनी दिले आहे. तसेच अशा खोट्या बातम्या पसरवणार्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.