शिराळा / प्रतिनिधी : बिऊर, ता. शिराळा येथील शांतीनगर येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दिड एकरमधील गवत जळून खाक झाले. शांतीनगर येथे विजेच्या ख...
शिराळा / प्रतिनिधी : बिऊर, ता. शिराळा येथील शांतीनगर येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दिड एकरमधील गवत जळून खाक झाले.
शांतीनगर येथे विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने गवत जळून खाक झाले असे येथील शेतकरी बोलत होते. जवळपास या आगीची तीव्रता एवढी होती की पन्नास एकरच्या आसपास संपूर्ण गवत जळून खाक झाले असते. दुपारच्या वेळेत लागलेली आग आटोक्यात आणण्याचे काम फारच कसरतीचे होते. त्यातच सुसाट सुटलेला वारा त्यामुळे आग विजवणे फार धोक्याचे होते. परंतू गावातील काही तरुण मंडळींनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु ठेवले. त्यामुळे दीड-दोन एकराच्या आसपास आग विझवण्यात त्यांना यश आले. आग आटोक्यात आल्यामुळे पुढील जवळपास पन्नास एकराच्या आसपास असणारे गवताचे रान वाचले.
--------------------------
गेली चार वर्ष झाले वरचेवर याविभागात शॉर्टसर्किटमुळे अनेक वेळा गवत जळालेले असून वायरमन याकडे दुर्लक्ष करत आहेत. आज जर शेतकरी येथे आले नसते आणि त्यांनी आग विझवली नसती तर जवळपास 50 एकर रान जळीत झाले असते. या झालेल्या नुकसानीचे भरपाई कोण देणार? काय करायचे या गरीब शेतकर्यांनी यात काय चुक होती.
मधू पाटील (शेत मालक)
----------------------
आम्ही जणावरे चरावयास घेवून पावलेवाडीच्या खिंडित बसलो होतो. आग लागल्याचे दिसल्यानंतर आम्ही पळत आलो. आग आटोक्यात आणेपर्यंत जवळपास दीड एकराच्या आसपास रान जळाले आहे. आम्ही दहा हजार रुपये एक ट्रॉली असं गवतरान विकत घेतो. त्यात शॉर्टसर्किटने नुकसान होणार असेल तर आम्हाला काय परवडणार आहे.
शेतकरी