गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांच...
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्लीवारी केली होती. त्यात आता भाई जगताप यांनी बाजी मारल्याचं दिसत आहे.
अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख
भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार.
जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म
भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव विशेष म्हणजे भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली आहे. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची निवड जवळपास निश्चित करुन मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरूद्ध मराठी विरूद्ध मराठी नेते अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रामधील संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल, आशिष दुवा, महाराष्ट्र प्रभारी सचिव उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये संघटन फेरबदल आणि जिल्ह्याध्यक्ष बदलावर चर्चा झाली. जानेवारीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अध्यक्ष बदलणार आहे.