सिदखेडराजा आज सिदखेडराजा तालुक्यात शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून सिंदखेड राजा व सिद...
सिदखेडराजा
आज सिदखेडराजा तालुक्यात शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून सिंदखेड राजा व सिदखेडराजा तालुक्यातील दुसर बीड किनगावराजा राहेरी येथे पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदलादुसरबीड येथे मंगळवार बाजार चा दिवस असून सुद्धा व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता कडकडीत बंद पाळण्यात आला.
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरण व शेतकऱ्यावर लावण्यात येणाऱ्या कायदा हा शेतकऱ्याच्या बरबादी चे कारण होऊ शकतो हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून शेतकऱ्याची अधिकार हिरावून घेण्याच्या कामे लागल्याचे दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी फार मोठा लढा उभा केला सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा गवगवा करून आपले सरकार चा वापर करीत आहे शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी भूमिका मांडण्यास नाही म्हणून शेतकरी स्वतः आपल्या हक्कासाठी लढण्यास सज्ज झाला याला सत्ताधारी आणि विरोधक सर्वांनी सहकार्य करण्याचे भूमिका घेतली याच भूमिकेतून अनेकांनी आपला पाठिंबा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा करण्यात येतात समर्थन दिले त्याचाच एक भाग म्हणून सिदखेडराजा सह तालुक्यातील दुसरबीड ,किनगावराजा, राहेरी येथील आजचा कडकडीत बंद असून हा बंद यशस्वी झाला. या बंद मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस ,यांच्यासह सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.