मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि अजब दाव्यांमुळे राखी सावंत कायम चर्चेत असते. सध्या ही ड्रामा क्वीन बिग बॉस 14’ मध्ये भाग घेतल्य...
मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि अजब दाव्यांमुळे राखी सावंत कायम चर्चेत असते. सध्या ही ड्रामा क्वीन बिग बॉस 14’ मध्ये भाग घेतल्याने तिची चर्चा चालू आहे. अशातच राखीने आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत.
मी माझ्या करिअरमध्ये खूप काही केलं यामध्ये लोकांचं मनोरंजन, काही जण तर मला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन बोलतात. पण असो मी काहीतरी आयुष्यात केलं. रस्त्यावर बसून भीक तर मागितली नाही आणि काही चुकीचंदेखील केलं नसल्याचं राखी सावंत यांनी म्हणाली.
मी कधीच रडले नाही. पण एकदा माझ्या डोळ्यात पाणी आलं ते माझ्या वडिलांना पाहून. कारण, माझ्या मुलीने काही तरी करुन दाखवलं हे त्यांच्या डोळ्यात मला दिसत होतं. त्यामुळे त्यांना पाहून मला रडू आलं, असंही राखीने सांगितलं.
दरम्यान, आपल्या लग्नाविषयी बोलताना राखी सावंत म्हणाली, माझ्या लग्नाविषयी अनेक चर्चा रंगतात. पण मी खरंच लग्न केलं आहे. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही.